तोंडओळखीचा गैरफायदा घेत पुण्याचा टायर शेख ने मालुंज्यासारख्या ग्रामीण भागातील अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला पंचवीस दिवसांपूर्वी पळवल्याने शहरांमध्ये माजलेले लव जिहादचे पेव आता खेड्यापर्यंत आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण.

तोंडओळखीचा गैरफायदा घेत पुण्याचा टायर शेख ने मालुंज्यासारख्या ग्रामीण भागातील अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला पंचवीस दिवसांपूर्वी पळवल्याने शहरांमध्ये माजलेले लव जिहादचे पेव आता खेड्यापर्यंत आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण.
पंचवीस दिवसांपूर्वी तालुक्यातील मालुंजा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय दोन मुलांचा बाप असलेल्या टायर शेखला मुलीसह मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून टायरवर अट्रासिटी व बलात्कारासह पोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद झाली असून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून “लव जिहाद” करण्याचे भयावह प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याने शासन यावर कठोर कायदा करत नाही तोपर्यंत असे प्रकारांना आळा बसणार नसल्याचे बोलले जात आहे.
मालुंज्यातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील मुलीची पुणे येथे राहत असलेला टायर रशीद शेख याच्याशी ओळख झाली.त्या ओळखीचा गैरफायदा घेत टायरने त्या अल्पवयीन मुलीला मालुंजा येथून पंचवीस दिवसांपूर्वी घरातील सर्वजण मोलमजुरीसाठी बाहेर गेले असतांना त्या परिस्थितीचा फायदा घेत फूस लावून पळवून नेले.आईवडील,आजी मोलमजुरी करून संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी तिचा गावभर व पाहुण्यांकडे शोध घेतला पण मिळून न आल्याने मुलगी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यात दिली.त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी त्यांच्या पोलीसांसह तपास चक्रे फिरवून मुलीला व टायर रशीद शेख यास पुण्यातून ताब्यात घेतले.
दोघांना श्रीरामपुरात आणल्यानंतर मुलींच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला पण राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी मुलीच्या पालकांशी बोलून त्यांना आत्मिक धीर दिल्याने त्यांच्यावर दबाव टाकणारे शांत झाले.पुण्याचा विवाहित दोन मुलांचा बाप असलेला टायर शेख श्रीरामपुर तालुक्यातील मालुंजा सारख्या ग्रामीण भागातील मुलीला लव जिहादच्या नावाखाली फूस लावून पळवतो म्हणजे लव जिहादची पाळंमुळं किती खोलवर गेलेली आहेत हे लक्षात येते.
मुलीची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर टायर शेखवर भादवी कलम ३६६(अ),३७६(२)(N)५०६,पोस्को कलम ४,६,८व १२ अन्वये गुन्ह्याची नोंद करून अट्रासीटी ,पोस्को अंतर्गत व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.