टाकळीभान 10 सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले. ग्रामपंचायत अधिनियमा नुसार त्या दहा सदस्यांना अपाञ ठरवावे. चौकशी पुर्ण होवुनही कारवाई होत नसल्याने,आठ दिवसात निर्णय दिला नाही तर औरंगाबाद खंडपिठात दाद मागणार
टाकळीभान 10 सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले. ग्रामपंचायत अधिनियमा नुसार त्या दहा सदस्यांना अपाञ ठरवावे.
चौकशी पुर्ण होवुनही कारवाई होत नसल्याने,आठ दिवसात निर्णय दिला नाही तर औरंगाबाद खंडपिठात दाद मागणार
टाकळीभान ग्रामपंचायतीच्या गेल्या दिड वर्षापुर्वी चुरशिच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकित एकहाती सत्ता काबीज करणाऱ्या लोकसेवा महाविकास आघाडीच्या दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केलेले आसल्याने ग्रामपंचायत अधिनियमा नुसार त्या दहा सदस्यांना सदस्यपदी रहाण्यास अपाञ ठरवावे अशी मागणी शिवसेनेचे राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कोर्टात केली होती. त्यानुसार चौकशी पुर्ण होवुनही कारवाई होत नसल्याने व दाखल विवाद अर्जावरील निर्णय मोठा कालावधी होऊनही प्रलंबीत आसल्याने येत्या आठ दिवसात निर्णय दिला नाही तर औरंगाबाद खंडपिठात दाद मागणार आसल्याचे वाघुले सांगितले आहे.
टाकळीभान ग्रामपंचायतीच्या जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या चुरशिच्या निवडणुकित सत्ताधारी गटाचा दारुण पराभव करीत १७ पैकि १६ सदस्य लोकसेवा महाविकास आघाडीचे निवडुन येवुन लोकसेवा महाविकास आघाडीने एकहाती सत्ता काबीज केलेली आहे. माञ या विजयाचा आनंदोत्सव साजरा करीत आसतानाच शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी एप्रिल २०२१ मध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १० ( १ ) ( ज ३ ) नुसार मा. जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात विवाद अर्ज दाखल करुन या सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केलेले आसल्याने या सर्व १० सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे अशी मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात वेळोवेळी सुनावणी ठेवण्यात आलेली होती. गटविकास अधिकारी, श्रीरामपुर यांना अतिक्रमणाबाबत स्थळ निरीक्षण करुन अहवाल देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले होते.त्यानुसार १९ जानेवारी रोजी गटविकास आधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवुन पहाणी करुन नमुद ग्रामपंचायत सदस्य १ ते १० यांनी अगर त्यांच्या नातेवाईकांचे ग्रामपंचायत मिळकत नं. ८ अहवाला सोबत जोडलेले आसुन सोबतच्या मिळकती या शासनाच्या गट नंबर मधील आसल्याचे दिसुन येत आहे. तसेच सदरची जागा संबधीतास मालक हक्कासह वर्ग अथवा त्यांच्या नावावर केल्याचे आढळुन येत नाही. त्यामुळे सदरचे बांधकाम व मोकळी जागा ही ग्रामपंचायत नमुना नं. ८ मध्ये मालक सदरी ग्रामपंचायत टाकळीभान दिसुन येत आसल्याने सदर अतिक्रमण आसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. तसेच सदरचे आतिक्रमण हे सहा महीण्यापेक्षा जास्त कालावधीचे आसल्याने सदरचे अतिक्रमण निश्कासित करणे बाबत आपले स्तरावरुन आदेश व्हावेत असे गटविकासआधिकारी यांनी चौकशीत आहवाल सादर केलेला आहे. याप्रकरणी सर्व संबधितांची चौकशी पुर्ण होवुन सुमारे चार महीण्यापेक्षा जास्त कालावधी उलटुन गेला आसला तरी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी निर्णय दिलेला नाही. त्यामुळे हे सदस्य ग्रामपंचायतीचे दैनिक कामकाज पहात आहेत.
त्यामुळे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी या विवाद अर्जावर येत्या आठ दिवसात योग्य तो निर्णय द्यावा अन्यतः न्यायासाठी औरंगाबाद खंडपिठाद दाद मागणार आसल्याचेही वाघुले यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी येत्या आठ दिवसात काय निर्णय घेतात ते पहावे लागेल.