वाळू लिलाव होऊ नये म्हणून वांगी बुद्रुक गावाने दर्शविला विरोध.
वाळू लिलाव होऊ नये म्हणून वांगी बुद्रुक गावाने दर्शविला विरोध.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मधील प्रवारा नदी पात्रातील निम्मे हद्दीतील वाळू लिलाव प्रक्रियेस तहसीलदार यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचे आयोजन यापूर्वी ग्रामपंचायतीने केले होते परंतु ग्रामसभेने वाळू लिलाव प्रक्रियेस विरोध दर्शविला त्यामुळे पुन्हा जिल्हा अधिकारी यांचे आदेशाने फेर लिलाव प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 7/7/2022 रोजी दुपारी 5 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे वाळू लिलाव प्रक्रिया पार पडली त्यावेळी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला सरकारी कर्मचारी यांनी नदीपात्रात वाळू असले बाबत शासन स्तरावर माहिती पुरवठा केलेल्या माहितीनुसार शासनाने लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली असल्याची माहिती प्रांत अधिकारी पवार यांनी दिली त्यावर ग्रामस्थांनी गावाच्या कडेने नदीचा प्रवाह आहे. 2012 मध्ये ग्रामपंचायत ने ग्रामस्थांना विश्वासात न घेता वाळू लिलाव केला होता असे ग्रामस्थांचे म्हणणे होते.
त्यामुळे गावातील नदीमधील वाळू गेल्याने नागरिकांना शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. थोडीफार वाळू शिल्लक आहे तिच्यामुळे नदीमध्ये पाणी जिरते व आमच्या उपजीविकेचे साधन असलेली शेती पिकणे वाळू गेल्यावर आमच्या व आसपासच्या गावांवर उपासमारीची वेळ येऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आम्ही सर्वजण वाळू लिलावास विरोध करत आहोत व आमच्या वाळू लिलावाला विरोध आहे. असे मत नागरिकांनी मांडले.
यावेळी प्रांताधिकारी पवार, तहसीलदार पाटील, मंडल अधिकारी ओहोळ, तलाठी सूर्यवंशी, हाडोळे, प्रांताधिकारी ऑफिस कर्मचारी सावळे. आदी अधिकारी या लिलाव प्रक्रियेस उपस्थित होते.
तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक जाधव मॅडम, दिलीप नन्नवरे, अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने, बाळासाहेब नरोटे, बाळासाहेब बाचकर, पारसनाथ माने, शिवाजी वाघमोडे, राजू माळी, जगन्नाथ बिडगर, शिपाई पुंजा पवार. आदी ग्रामस्थ उपस्थित होते.