ब्रेकिंग
स्वाध्याय केंद्र विकास कामे करण्यासाठी परवानगी मिळावी ,
परिवाराच्या आडून जागा ताब्यात घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार -सरपंच रणनवरे,
स्वाध्याय केंद्र विकास कामे करण्यासाठी परवानगी मिळावी , परिवाराच्या आडून जागा ताब्यात घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार -सरपंच रणनवरे,
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील स्वाध्याय केंद्रात स्वाध्याय व विकासकामे सुरू करण्यास परवानगी परवानगी मिळावी या आशयाचे निवेदन नूकतेच स्वाध्याय परिवारातील सदस्यांनी ग्रामविकास अधिकार्यांना दिले असून, सरपंच अर्चना रणनवरे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात कुणी जर स्वाध्याय परिवाराच्या आडून या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे.
स्वाध्याय परिवारातील सदस्यांनी निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभान ग्रा.पं.प्रशासनाने २३ जुलै २००३ रोजी ग्रा.पं.सदस्यांच्या मासिक बैठकीतील ठराव क्र. ६ नूसार स्वाध्याय केंद्र मंदीरासाठी अनू.क्र.१९५९ व मिळकत क्र.९६० नूसार साहान जागा दिलेली आहे. त्या जागेत नंतर स्ववर्गणीतून पत्र्याचे शेड उभारण्यात आले होत. तरी त्या जागी आम्ही प्रार्थना करणार असून, विकासाचे कामे हाती घेणार आहोत. तरी आम्हांला स्वाध्याय केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळावी. असे म्हटले आहे. या निवेदनावर सयाजी नागरे, रावसाहेब वाघुले, भारत गायकवाड, सुभाष जगताप, डाॅ.विवेक तुपे, मच्छिंद्र आनंदकर, बापूसाहेब शिंदे, श्रीधर गाडे, पाडूरंग कोकणे आदींच्या सह्या आहेत. प्रार्थना स्थळाची जागा लवकरच दरवाज्या, खिडक्या लावून भक्त परिवाराच्या ताब्यात देणार आसल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगीतले.
या जागेसंदर्भात स्वाध्याय परिवाराच्या वरिष्ठ अधिकार्यांनी आमचा कुठलाही काही संबध नसल्याचे सांगीतले असून, कुणी परिवाराला बदनाम करीत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असे सांगीतले. तरी या जागेचा टाकळीभान ग्रा.पं.वतीने अधिकृत लिलाव करून त्यातून येणारी रक्कम ही जगतगुरू संत तुकाराम महाराज मंदीर निर्माणासाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वानूमते घेण्यात येत आहे. कुणी जर परिवाराच्या आडून सदर जागेवर ताबा अथवा वापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आसल्याचे सरपंच अर्चना रणनवरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
Rate this post