ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

टाकळीभानच्या सरपंचाच्या राजीनाम्या सोबतच उपसरपंच पदाचा राजीनामा देणार — उपसरपंच खंडागळे यांची पञकार परीषदेत घोषणा.

 टाकळीभानच्या सरपंचाच्या राजीनाम्या सोबतच उपसरपंच पदाचा राजीनामा देणार — उपसरपंच खंडागळे यांची पञकार परीषदेत घोषणा.

टाकळीभान येथील सरपंच यांचा महाविकास आघाडीतील ठरावाप्रमाणे २० महीण्यांचा कार्यकाळ संपत आल्याने कार्यकाळ संपण्यापुर्वी त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा द्यावा त्यासोबतच मी उपसरपंच पदाचा राजीनामा देणार आसल्याची घोषणा टाकळीभानचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी ग्रामसचिवालयात आयोजित पञकार परीषदेत बोलताना केली. माजी सरपंच मंजाबापु थोरात, भारत भवार, बापुराव ञिभुवन, विलास दाभाडे, मेजर विनोद रणनवरे यावेळी प्रमुख उपस्थित होते.

               गेल्या वर्षभरापासुन एकहाती सत्ता मिळालेल्या ग्रामपंचायतीच्या सत्ताधार्यांमध्ये संघर्ष पेटलेला आसल्याने विकास खुंटल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे. सरपंच व उपसरपंच असे दोन गट झाल्याने विकासा ऐवजी कुरघोड्यांचा खेळ रंगल्याने ग्रामस्थांकडुन ग्रामपंचायत प्रशासनाला दोषी धरले जात आसल्याने गेल्या चार दिवसापुर्वी उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सोशल मिडीयावर पदाच्या राजीनाम्यावर विचार विनिमय करुन भुमिका मांडण्यासाठी पञकार परीषद घेत आसल्याचा संदेश टाकुन खळबळ उडवुन दिली होती त्यामुळे सर्वांच्या नजरा या पञकार परीषदेकडे लागल्या होत्या.
      यावेळी आयोजित पञकार परीषदेत बोलताना खंडागळे म्हणाले कि, गेल्या दिड वर्षापुर्वी महाविकास आघाडीची स्थापना करुन आंम्ही निवडणुक लढवली. महाविकास आघाडीचे १६ सदस्य निवडुन आले होते.सरपंच पद अनु.जाती महीला प्रवर्गासाठी राखीव आसल्याने व महाविकास आघाडीत दोन महीला या मतदार संघातुन निवडुन आल्याने व सर्वसाधारण जागेतुन एक आनु. जातीची महीला निवडुन आल्याने सरपंच पदासाठी तीन महीला पाञ होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकित तीनही महीलांना सरपंच पदाची संधी देण्यासाठी २०-२० महीण्याचा कार्यकाळ देण्याचा ठराव करण्यात आला व प्रत्येक वर्षी उपसरपंच निवड करण्याचे ठरले होते. त्यानुसार प्रथम सरपंच म्हणुन अर्चना यशवंत रणनवरे व उपसरपंच पदी माझी निवड करण्यात आली आहे. आगामी २० ते २५ वर्षे आरक्षण चक्रानुसार आनु. जाती महीलेला सरपंच पदाची संधी मिळणार नसल्याने उर्वरीत दोन आनु. जातीच्या महीलांना संधी मिळावी ही आमची आपेक्षा आहे. त्यामुळे येत्या दोन महीण्यात विद्यमान सरपंच यांचा २० महीण्याचा कार्यकाळ संपत आसल्याने उर्वरीत दोन महीलांना सरपंच पदाची संधी देण्यासाठी राजीनामा द्यावा. सरपंचांच्या राजीनाम्यासोबतच मी उपसरपंच पदाचा राजीनामा देवुन अन्य सदस्याला संधी देणार आहे. मी आजच माझे राजीनामा पञ माजी सरपंच मंजाबापु थोरात व जयकर मगर यांच्याकडे देत आसुन सरपंच व उपसरपंच यांचे राजीनामे एकाच बैठकित मंजुर करावेत व मतदारांना व सदस्यांना दिलेला शब्द महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाळावा आशीही भुमिका खडागळे यांनी यावेळी मांडली. कुरघोडीच्या राजकारणात विकास खुंटला आसल्याचीही कबुली त्यांनी यावेळी देवुन ग्रामपःचायतीच्या सत्तेत आहे तोपर्यंत कोणत्याही सदस्याला चुकिचे काम करु देणार नाही. चुकिचे काम करणाऱ्या सदस्यांची कामे आडवल्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीत खदखद निर्माण केली आसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 
         माजी सरपंच मंजाबापु थोरात यावेळी म्हणाले कि, निवणुकिनंतर खंडागळे उपसरपंद घेत नव्हते माञ आघाडीच्या नेत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पद स्विकारले. सरपंच पदासाठी पाञ आसलेल्या उर्वरीत दोन्ही महीलांना संधी दिली जावी आसे ते म्हणाले. अनु. जातीच्या महीलांना ठरल्याप्रमाणे संधी मिळालीच पाहीजे व जर विद्यमान सरपंच २० महीण्याचा कार्यकाळ संपुणही पद सोडत नसतील तर वेगळी रणनिती आखली जावी अशी मागणी मेजर विनोद रणनवरे यांनी या पञकार परीषदेत केली.
     यावेळी ग्रा. प.सदस्य सुनिल ञिभुवन, अशोक कचे, भाऊसाहेब पटारे, जयकर मगर, मोहन रणनवरे, सुंदर रणनवरे,  तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर, उपाध्यक्ष विलास सपकळ, बापुसाहेब शिंदे, महेंद्र संत, गणेश गायकवाड, रघुनाथ शिंदे, जाॕन रणनवरे, प्रणव आमोलिक, कान्हा खंडागळे मिञमंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे