ब्रेकिंग
रंग खेळताना बंधाऱ्यात पडून तरुण मुलाचा मृत्यू
रंग खेळताना बंधाऱ्यात पडून तरुण मुलाचा मृत्यू
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील बेलापुर ऐनतपुर शिवारातील अशोक बंधाऱ्यातील तळ्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला असुन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरुन पोलीसांनी अकस्मात गुन्हा दाखल केला आहे बेलापुर येथील विशेष महेंद्र शिवदे हा १६ वर्षाचा मुलगा रंगपंचमी असल्यामुळे रंग खेळण्याकरीता अशोक बधांऱ्याच्या तळ्याजवळ गेला होता तोल जावुन तो तळ्यात पडला त्याच्या सोबत असणारांनी आरडाओरडा केल्यामुळे नागरीकांच्या मदतीने त्यास बाहेर काढण्यात आले ही माहीती जि प सदस्य शरद नवले यांना समजताच त्यांनी तातडीने त्या मुलास साखर कामगार रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या माहीतीवरुन पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास पोलीस नाईक अमोल जाधव करत आहे .