जिल्हा सत्र न्यायालयासमोर आत्महत्या करणार्या मयत ऋषिकेश डव्हाण याच्या मृत्युस कारणीभूत असणारे सर्व आरोपी अटक व जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला.*
*जिल्हा सत्र न्यायालयासमोर आत्महत्या करणार्या मयत ऋषिकेश डव्हाण याच्या मृत्युस कारणीभूत असणारे सर्व आरोपी अटक व जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला.*
राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील मयत ऋषिकेश डव्हाण या तरुणाने त्याच्यावर व त्याचे वडिलावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला होता. व आपल्या चुलत भावाच्या अपहरणाच्या गुन्हयामधील आरोपी मोकाट फिरत होते या नैराश्यातुन जिल्हा सत्र न्यायालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता व पुणे येथे उपचारादरम्यान त्याचे दुखद निधन झाले. त्याच दिवशी मयताचे वडिल विठ्ठल डव्हाण यांच्या फिर्यादीवरून उज्वला थोरात, भारत थोरात व आण्णा थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. घटनेच्या दिवशीच उज्वला थोरात व आण्णा थोरात यांना अटक झाली होती. त्यानंतर फिर्यादी विठ्ठल डव्हाण यांच्या लक्षात आले की, आपल्या मुलाने पुणे येथे मृत्यूपूर्व जबाबमध्ये भारत थोरात यांची मुलगी शामला थोरात व पत्नी सुशिला थोरात या ही आपल्या मृत्यूस जबाबदार आहेत अशी बाब डि वाय एस पी श्री मिटके साहेब श्रीरामपुर व पो.नि. प्रताप दराडे साहेब राहुरी यांच्या लक्षात आणुन दिली त्याच दिवशी तात्काळ तपासी अधिकारी निरज बोकील साहेब यांनी पुरवणी जबाब घेवुन आरोपी शामल थोरात व सुशिला थोरात यांना अटक केली या गुन्हयातील पाचवा आरोपी फरार होता तो भारत थोरात यालाही पोलीसांनी अटक केली. या सर्व आरोपींचे जामिन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत.
या सर्व प्रकरणामध्ये राहुरी पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक प्रताप दराडे व तपासी अधिकारी निरज बोकिल यांनी जातीने लक्ष घालुन घटनेचे गार्भीय ओळखुन सर्व आरोपींना अटक केली. त्यांना जामिन मिळु नये यासाठी जिल्हा न्यायालयामध्ये कसोशीने प्रयत्न केले हीच माझे मुलासाठी श्रध्दांजली आहे. अशी भावना मयताच्या आई वडिलांनी व्यक्त केली.