गुन्हेगारी

घोडेगाव गोळीबार प्रतकणी पाच जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घोडेगाव गोळीबार प्रतकणी पाच जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अदयाप कोणालाही अटक नाही

 

घोडेगाव येथे दिवसाढवळ्या झालेल्या भीषण गोळीबार प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात स्वाती नितीन शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून, आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके मागावर आहे.

फिर्यादीत म्हटले की, गुरुवारी सायंकाळी ५. ३० वाजण्याच्या सुमारास घोडेगाव येथील घोरपडे हॉस्पिटल येथे दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेले होते. यावेळी गुलाब सादिक फुलमाळी, सुरज

फुलमाळी, आकाश अण्णा फुलमाळी, कृष्णा यल्लाप्पा फुलमाळी व भारत यल्लाप्पा फुलमाळी यांनी घोरपडे हॉस्पिटल येथे गोळीबार करून नितीन शिरसाट यांना जखमी केले. त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या खासगी दवाखान्यामध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने घोडेगाव परिसर हादरुन गेला आहे. घोडेगाव येथे तणावपूर्ण शांतता असून, अद्यापपर्यंत पोलिसांकडून दाखल झालेल्या

गुन्ह्यातील एकाही आरोपीला अटक केलेली नाही. परिसरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पोलीस प्रशासनाने घोरपडे हॉस्पिटलचा परिसर सील केला आहे. त्याचबरोबर प्रमुख चौक, संवेदनशील भाग तसेच गावातील मुख्य मागाँवर नाकाबंदी करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त वाढविण्यात आली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे