आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीदेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

बुऱ्हाणनगर सह 44 गावांची पाणी योजना थकीत वीज बिलामुळे बंद.योजनेचे वीज कनेक्शन तातडीने सुरु करण्याच्या सूचना

बुऱ्हाणनगर सह 44 गावांची पाणी योजना थकीत वीज बिलामुळे बंद.योजनेचे वीज कनेक्शन तातडीने सुरु करण्याच्या सूचना

 

 

गेल्या अनेक दिवसापासून बुऱ्हाणनगर सह 44 गावांची पाणी योजना थकीत वीज बिलामुळे बंद असून सदर योजनेचे वीज कनेक्शन तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी महावितरणच्या अधिकारी यांना दिल्या. तसेच या योजनेच्या कामावरील शाखा अभियंता याच्या निष्काळजी पणा मुळे त्यांना तातडीने निलंबीत करण्याचे आदेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.या योजनेतील गावांना जलजीवन मिशन योजनेतर्गत कायम स्वरूपी पाणी कसे देता येईल या बाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बुऱ्हाणनगर सह 44 गावांची योजना विस्कळीत झाल्याने ह्या योजनेवरील नागरिकांना जलजीवन मिशन योजने तुन सुरळीत पाणी पुरवठा करण्याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी जीवन प्राधिकरण खात्याच्या तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्या बरोबर चर्चा केली.सदर योजनेचे वीज कनेक्शन तातडीने जोडून देण्याचे आदेश महावितरणाचे कार्यकारी अभियंता एस एस काकडे ह्यांना दिल्याने सदर योजनेचा पाणीपुरवठा सुरु होईल असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी सांगितले.

आज विधान परिषदेच्या निवडणुकीची मुंबई येथे जोरदार हालचाली असताना सुद्धा बुऱ्हाणनगर सह 44 गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राहुरी पंचायत समितीच्या डॉ दादासाहेब तनपुरे सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ए ए मुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रुपनर महावितरणचे कार्यकारी अभियंता एस एस काकडे गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे राहुरीचे ग्रामीण पाणीपुरवठायचे उपभियंता एस एस गडढे जीवन प्राधिकरणचे उपभियंता व्ही आर देसाई,टी एच तुपे उपभियंता सी एस खाडे, उपभियंता श्रीमती चोभे सहाय्यक गट विकास अधिकारी अनंत परदेशीं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके सुरेश निमसे आदि उपस्थित होते.

सदर योजनेच्या थकीत वीज बिल भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचेशी 

गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेली बुऱ्हाणनगर सह 44 गावाची योजना गेल्या काही दिवसापासून विविध कारणामुळे बंद आहे. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.त्याबाबत राज्यमंत्री तनपुरे ह्यांनी सदर योजना सदया आहे त्यापेक्षा अधिक चांगली कशी चालवता येईल,राबवता येईल यावर अधिकारी व योजनेत समाविष्ठ असलेल्या सरपंच ग्रामसेवक सदस्य ह्यांचेशी सविस्तर चर्चा करताना म्हणाले की सरपंच सदस्य यांचे तक्रारी वरून या योजनेवर कार्यरत असलेला शाखा अभियंताचा निष्काळजी पणा पाहता त्यास तातडीने निलंबीत करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना आदेश दिले. त्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी. आजच्या बैठकीत ज्या काही सूचना अधिकारी वर्गास केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. त्याची पाहणी करण्यासाठी येत्या 8 ते 10 दिवसात सदर पंप हाऊस येथे भेट देणार असून तेथील आकडेवारी नुसार पाण्याचे पंपिग होते का नाही याची तपासणी करणार आहे. त्याबाबत येत्या 8 दिवसात योग्य ती ती कार्यवाही करावी. मी या योजनेबाबत आतापर्यंत 3 बैठका घेऊनही त्यात सुधारणा का होऊ शकली नाही. असा प्रश्न अधिकाऱ्यांना करून ह्याबाबत ही शेवटी सूचना देतो अन्यथा एका अधिकाऱ्याला निलंबीत केले पुन्हा तीच वेळ येऊ देऊन नका असा इशारा उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या 44 गावांसाठी जलजीवन मिशन मधून नवीन योजना तयार करायची असून त्यात नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसूबा,पिंपळगाव माळवी, धनगर वाडी, जेऊर व आजूबाजूच्या वाड्या, बहीरवाडी, ससेवाडी, इमामपूर शेंडी पोखर्डी पिंपळगाव उज्जेन या 11 गावांनी जाईंट वेलला मान्यता दिली असून त्यासाठी स्वतंत्र विळद पासून वेगळी पाईप लाईन टाकून देण्याची मागणी केली आहे.15 /16 गावांसाठी सदर योजना व्यवस्थित होऊ शकते. त्याबाबत सविस्तर अभ्यास करून पुढील बैठकीत माहिती देण्याच्या सूचना केल्या.

राहुरी तालुक्यातील 6 गावे खडांबे खुर्द खडांबे बुद्रुक, धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, वरवंडी बाभुळगाव या गावांनी सदर योजनेत राहायचे नसून आम्हाला स्वतंत्र योजना जल जीवन मिशन मधून देण्याची मागणी केली. यासाठी सद्या कार्यरत असलेल्या फिल्टर हाऊस असून तिथे पेविंग मोटार टाकून स्वतंत्र पाईप लाईन करता येणे शक्य आहे. नव्याने होणाऱ्या बुऱ्हाणनगर योजनेसाठी मोठ्या साईजचे पंप बसविण्यात येणार आहे त्याबाबत संबंधित दोन्ही विभागाने ते तपासून घ्यावे

नवीन पंप आहे त्या जॅकवेल बसू शकते का? तरच सदर 6 गावांची योजना स्वतंत्र राबविता येईल.

बुऱ्हाणनगर पाणी योजनेवरील समास्याबाबत चर्चा करण्यापेक्षा व जागोजागी ढिगळ लावीत बसण्यापेक्षा सदर योजना मुळा पासून सुरु झाली पाहिजे. पंतप्रधानानी जी घोषणा केली घर घर पाणी ही घोषणा केवळ कागदावर न राहाता त्याचे व्यवस्थित नियोजन करून पाणी घरोघर कसे जाईल नाही तर ते पाणी योजनेतील गावांना न जाता सदर योजनेचे पाणी कुठे जाते हेही तपासावे लागेल. शासन पाणी योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च करते त्या योजना कमीत कमी 25 ते 30 वर्ष तरी टिकल्या पाहिजे. पाण्याचा प्रश्न भविष्यात उद्भवणार नाही असा माझा प्रयत्न असल्याचे यावेळी राज्यमंत्री तनपुरे ह्यानी सांगितले.

या बैठकीस डोगरगणचे सरपंच संतोष पटारे इमाम पुरचे सरपंच भिमराज मोकाटे, पोखर्डीचे सरपंच रामेश्वर निमसे बहीरवाडीचे सरपंच विलास सावंत, अध्यक्ष रामदास ससे,सरपंच किशोर शिकारे धामोरीचे सरपंच अशोक बकरे,सरपंच सुनीता पवार, खडाबे सरपंच कैलास पवार, खडाबे खुर्दचे सरपंच कानिफनाथ कल्हापुरे, प्रभाकर हरीश्चंद्रे प्रदीप लांडगे, दिलीप जठार शामराव खेतमालीस नंदकुमार गागरे,विविध गावाचे उपसरपंच सदस्य ग्रामसेवक अधिकारी उपस्थित होते.

राहुरी तालुक्यात जल जीवन मिशनचे कामाचे दिलेले उदिष्ट 100 टक्के पुर्ण केल्याबद्दल राहुरी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व उपभियंता एस एस गडढे व सर्व स्टाफचे कौतुक केले.

*बुऱ्हाणनगर सह 44 गावाचे पाणी योजनेच्या समस्या तालुक्यातील 6 गावा च्या पाणी प्रश्न याबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा मार्गदर्शन करताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व मान्यवर*

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे