बिबट्याचा मेंढीकल्पावर हल्ला तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी.
बिबट्याचा मेंढीकल्पावर हल्ला तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी.
राहुरी तालुक्यातील मानोरी गणपतवाडी परिसरामध्ये बिबट्याचा दिवसाढवळा वावर होत असून पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी होत आहे. बिबट्याने मानोरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक जबाजी धोंडीराम बाचकर यांच्या मेंढ्यांच्या कळपावर दुपारी 4 वाजता हल्ला करत एक मेंढी फस्त केली आहे. दुपारी ते मेंढ्या चारत असताना पाऊस आल्याने जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस निवारा असल्यामुळे तेथे मेंढ्या थांबवण्यात आल्या होत्या. मोकळ्या शेता लगतच ऊसाचे क्षेत्र आहे ऊसातून बिबट्याने मेंढ्याच्या कळपावर हल्ला चढवत एक मेंढी अंदाजे किंमत 14 ते 15 हजार रुपये किमतीची मेंढी फस्त केली. हा सर्व थरार नागरिकांसमोर घडला त्यामुळे गणपतवाडी परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभाग निद्रस्त असल्यासारखे दिसून येत आहे या आधीही रुद्रा न्यूज डिजिटल पोर्टलने याची बातमी प्रसारित केली होती की बिबट्यामुळे हानी होऊ शकते बिबट्या पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात यावा. आता तरी शेतकऱ्यांची हानी होऊ नये म्हणून लवकर पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात यावा. क्रूर झालेला बिबट्यापासून मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तात्काळ पिंजरा बसवून बिबट्या जेरबंद करण्यात यावा,अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.