ग्रामपंचायत शेजारी चालू असलेले अतिक्रमण बांधकाम त्वरित पाडावे… अन्यथा रास्ता रोको… मल्हार रणनवरे
टाकळीभान ग्रामपंचायत शेजारी चालू असलेले अतिक्रमण बांधकाम त्वरित पाडावे… अन्यथा रास्ता रोको… मल्हार रणनवरे
टाकळीभान:टाकळीभान ग्रामपंचायत शेजारील अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्रीरामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे सचिव मल्हार रणनवरे यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की टाकळीभान ग्रामपंचायत इमारतीला लागून दिवसा ढवळ्या बांधकाम करून अतिक्रमण सुरू आहे. ग्रामपंचायत इमारतीच्या खिडक्या सदर अतिक्रमण धारकांनी बंद केल्या आहेत. त्या बांधकामामुळे ग्रामपंचायत कार्यालयात पुरेसे उजेड आणि हवा येत नाही.
सदर बांधकाम हे जागेचे लिलाव करून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु ज्या जागेत बांधकाम सुरू आहे ती जागाही महाराष्ट्र शासन म्हणजेच महसूल विभागाची असून त्या जागेचा लिलाव करण्याचा अधिकार ग्रामपंचायतला नाही. ही जनतेची दिशाभूल केली जात आहे.शासनाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून सदर जागा लाखो रुपयांना खोटे कागदपत्र तयार करून विकण्यात आल्याचे ऐकवास मिळत आहे. महसूल विभागाचे अधिकारी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. सदर बांधकाम त्वरित पाडावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल असे मल्हार रणनवरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.