दोन डॉक्टरांमध्ये शिल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी*
*मादळमोही येथे दोन डॉक्टरांमध्ये शिल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी*
जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे दोन डॉक्टरांमध्ये शिल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठलदास हरकूट आणि अतुल बिर्ला हे दोघे डॉक्टर आहेत. डॉक्टर हरकूट यांनी अतुल बिर्ला यांना तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? असं विचारलं आणि हेच कारण पुढे करत बिर्ला यांनी चार जणांसह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली.
दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय आणि याच अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस आरोपी डॉक्टरांचा शोध घेत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या दोघांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
या घटनेमध्ये हे दोन्ही डॉक्टर माधवी या गावी आपल्या डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतात. एकाचा दवाखाना मोठ्या प्रमाणात चांगला चालतोय तर दुसऱ्या डॉक्टरांना मात्र हवा तसा प्रतिसाद येत नाहीये. दोन्ही क्लिनिकमध्ये अंतर ही फारसे नाहीये आणि यामुळेच या दोघांत नेहमीच किरकोळ कारणावरून टोकाचे भांडण झालेले गावकरी सांगतात. हे दोन्ही डॉक्टर एकमेकांना बोलताना देखील टोमण्यातच बोलत असल्याचं अनेकांनी सांगितले.
दोन्ही डॉक्टरांमध्ये झालेला वाद क्षुल्लक कारणावरून हाणामारीपर्यंत पोहोचणे. हे काय इतरांना नवीन नव्हतं. मात्र हा वाद सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने याचा फायदा घेत डॉक्टर हरकोटने बिर्ला विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यामध्ये शिवीगाळ केली असेही त्यांनी म्हणलं. सीसीटीव्हीमध्ये देखील मारहाण करताना डॉ. बिर्ला दिसत आहेत.
मात्र या डॉक्टरांचे नेहमीचेच वाद असल्याचे स्थानिक लोक म्हणतात. हा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉक्टरांच्या या फ्री- स्टाईल हाणामारीमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे