टाकळीभान मध्ये शॉर्ट सर्किटमुळे नऊ एकर ऊस जळून खाक !
टाकळीभान येथील पिंपळगाव रस्त्यावरील तीन शेतकऱ्यांचा नऊ एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी दुपारी बारा वाजता जळून खाक झाला आहे त्यामुळे लाखो रुपयांची नुकसान झाले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण करून प्रथम बंडोपंत वेताळ (गट नं.२४) एक एकर, बाबासाहेब दत्तात्रय तनपुरे गट नं.४३ मधील तीन एकर, त्यानंतर अशोक साखर कारखान्याचे माजी संचालक मंजाबापू धोंडीबा थोरात यांचे चार एकर तोड तोडणे योग्य ऊस जळून खाक झाला आहे या परिसरात सुमारे संलग्न ७० एकर शेतकऱ्यांची उसाचे पीक उभे आहे मात्र अशोक सहकारी साखर कारखाना यांच्या अग्निशमन बंब व आसपासच्या शेतकऱ्यांच्या मदतीमुळे आग आटोक्यात आली कामगार तलाठी अरुण हिवाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन संबंधित नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत
महावितरणचे सहकार्य-
ऊस जळीत सुरू असताना सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू होता मात्र संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रकारांनी संपर्क साधून अग्निशमन बंबाला पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी महावितरणचे ज्ञानेश्वर हाळणोर त्यांनी थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू केला.टाकळीभान मध्ये शॉर्ट सर्किटमुळे नऊ एकर ऊस जळून खाक !
-माझे नुकसान पण बांधभावांना मदत.
माझेही नुकसान झालेले असताना, वेताळ व तनपुरे हे माझे बांधभाऊ आहेत. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्यांना कसा फायदा होईल यासाठी मी प्रयत्न करेल – मंजाबापू थोरात, माजी संचालक
Rate this post