नागपूर घटना महाराष्ट्राला बदनाम करणारी व भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आणणारी – सागर बेग

नागपूर घटना महाराष्ट्राला बदनाम करणारी व भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आणणारी – सागर बेग
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- बहुसंख्येच्या बरोबरीने लोकसंख्या झालेल्या व आजही अल्पसंख्यांकाचे सगळे सरकारी फायदे लूटणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या मुसलमानांनी बांगला देशी,रोहिंग्या घुसखोरांच्या जोरावर नागपूर दंगलीत पोलिसांवर चौफेर दगडफेक केली त्यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ले करत जखमी केले तर काहीठिकाणी महिला पोलिसांच्या अब्रुवर सुद्धा हात टाकण्याची मजल जीहाद्यांची गेली ही बाब अत्यंत चिंताजनक आणि महाराष्ट्राची बदनामी करणारी व भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आणणारी आहे अशा जिहादी प्रवृत्त्यांच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांच्या नांग्या ठेचल्या तरच भविष्यात असे प्रकार थांबतील अन्यथा पोलिसांवर हल्ले करण्या इतपत गेलेली मजल उद्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठेल असा समयसूचक सावधगिरीचा सल्ला राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी शासनाला दिला आहे.*
सकल हिंदू समाज व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने नागपूर दंगलीत जीहादी प्रवृत्तींनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आणि पोलिसांच्या मागे खंबीरपणे सकल हिंदू समाज उभा आहे हा संदेश देण्यासाठी “महाराष्ट्र पोलीस के सन्मान मे सकल हिंदू समाज मैदान मे” या घोषणेचे बॅनर घेत संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात निवेदन दिल्यानंतर सागर बेग हे सकल हिंदू समाज बांधवांसमोर बोलत होते.
याप्रसंगी बोलतांना ते पुढे म्हणाले की,दिवसेंदिवस या जिहादी चळवळी वाढत चालल्या असून तो अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे.त्यावर वेळीच लगाम घातला नाहीतर भारताचे सार्वभौमत्व या जिहादी प्रवृत्तीमुळे धोक्यात यायला वेळ लागणार नाही.त्यासाठी पोलिस प्रशासना बरोबरच हिंदूंनी देखील सतर्क राहणे आज गरजेचे होऊन बसलेले आहे.आपापल्या भागात जागरूक राहून जवळपास कोणी अनोळखी जिहादी दिसल्यास त्याची खबर जवळच्या पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन करत बेग म्हणाले की,भारतात प्रचंड मोठ्याप्रमाणात जिहादी बांगला देशी,रोहींग्या ची घुसखोरी झाली असून श्रीरामपूर शहरात देखील अशा घुसखोरांची संख्या खूप मोठी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.घुसखोरांमुळे जिहाद्यांची ताकद वाढली असली तरी हिंदूंनी एकी ठेवल्यास असे भ्याड हल्ले करण्याची हिंमत ते करणार नाहीत.
याप्रसंगी तालुक्यातून बहुसंख्येने सकल हिंदू समाज या मोर्चात सहभागी होऊन पोलिसांचे मनोधर्य वाढवून नागपूर दंगलीत पोलिसांवर हल्ले करणाऱ्या जिहाद्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे असंख्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.