बांगला देशातील अल्पसंख्याक हिंदुंवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारा विरोधात दि.१० रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन -सागर बेग
बांगला देशातील अल्पसंख्याक हिंदुंवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारा विरोधात दि.१० रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन -सागर बेग
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- बांगला देशातील अल्पसंख्याक हिंदुंवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारा विरोधात आणि तेथील हिंदूंच्या मागे भारतीय हिंदू खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्यासाठी व शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य भूमिका घेऊन हिंदू हिताचे पाऊल उचलावे म्हणून मंगळवार दि.१० रोजी मानवाधिकार दिनी हजारोंच्या संख्येने भव्य मोर्चाने जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केले आहे.*
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सागर बेग यांनी पुढे म्हंटले आहे की,हिंदू समाज बांधवांवर आजपर्यंत सतत अन्याय अत्याचार होत आलेले आहेत.त्यावर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी याअगोदर आवाज उठवलेला नाही तर मानवाधिकार या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही त्याची साधी कधी दखलही घेतलेली नाही.परंतु विशिष्ठ समाजाच्या लोकांवर झालेल्या किरकोळ अन्यायाच्या बाजूने मानवाधिकार संघटनेने आवाज उठवून हिंदूंवर एकप्रकारे अन्यायच केलेला आहे.हिंदूंवरील अन्यायाविरोधात तेथीलच सन्यासी चिन्मय दास स्वामींनी निषेध नोंदवला म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले या गंभीर घटनेचा भारत सरकारने निषेध सुद्धा नोंदवलेला आहे.तेथील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्था देखील हिंदूंवरील अत्याचारास पाठबळ देत असल्याचे सिद्ध झालेले असून तो चिंतेचा विष्य आहे. भारतात छोट्या मोठ्या घटनांवर आकांडतांडव करणारे आज बांगला देशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार अन्यायाबाबत गप आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे.
मानवाधिकार दिनी संपूर्ण महाराष्ट्रात दि.८ व १० रोजी दोन टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू एकत्र येऊन शासनाला निवेदन देणार आहेत.त्यातलाच एक भाग म्हणून मंगळवार दि.१० रोजी श्रीरामपूर तालक्यातील हिंदूंनी मोठ्या संख्येने येऊन शांततेच्या मार्गाने जाऊन श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन देऊन शासलाना बांगला देशात हिंदूंवर होणारे अन्याय थांबण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवान हलचाली करून प्रयत्न करणेबाबत विनंती करण्यात येणार आहे असे निवेदनात बेग यांनी शेवटी म्हंटले आहे.