मुळा धरणाच्या भिंतीवरील काम निकृष्ठ दर्जाचे, वाळूऐवजी डस्टचा वापर
मुळा धरणाच्या भिंतीवरील काम निकृष्ठ दर्जाचे, वाळूऐवजी डस्टचा वापर
मुळा धरणाच्या भिंतीवर खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरू असून सदरचे कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ठ आहे वाळूऐवजी चक्क दगडाच्या डस्टचा वापर केला जात असल्याने संगनमताने शासकीय निधीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप स्थानिकांमधून केला जात आहे या कामाची सखोल चौकशी होवून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुळा धरणाच्या भिंतीवरील लहानमोठे भगदाड व खड्डे बुजविण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे एकतर धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे त्यात अतिशय महतावाच्या अशा भिंतीची डागडुजी करणेही तितकेच महत्वाचे आहे सदरचे काम योग्य दर्जा राखून होणे गरजेचे आहे सदरचे काम एका ठेकेदारामार्फत सुरू आहे माञ अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने काम करायचे म्हणून फक्त कामाचा दिखावा करण्याचा उद्योग येथे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर पहावयास मिळाला याबाबत विचारणा केली असता सेवानिवृत्त झालेल्या शाखा अभियंत्याच्या कार्यकाळातील हे काम असल्याचे जबाबदार अधिकार्याने सांगितले असून त्यांनीच ठेकेदार नेमला असल्याची माहिती दिली म्हणजे ‘आंधळ दळतंय नि कुञ पीठं खातं’ अशीच एकंदरीत अवस्था सध्या या कामाची पहावयास मिळाली आहे
याबाबत संबंधित यंञणांनी तातडीने दखल घेत या कामाची व यात गुंतलेल्या त्या अधिकार्यांची चौकशी करून योग्य कारवाईची मागणी जनतेतून होत आहे.
मुळा धरणाच्या सी.सी. टीव्ही कॅमेराने टाकल्या माना. फक्त मुळा धरणावर दोनच कॅमेरे आहे. आता तर धरण भरण्याच्या मार्गावर आहे मग काय दोनच कॅमेराची सुरक्षा आहे की काय?