प्रसिद्ध पार्श्वगायीका अनुराधाताई पौडवाल यांना शनि जयंती निमित्त शिंगणापूर व बेलापूर भेटीचे निमंत्रण
प्रसिद्ध पार्श्वगायीका अनुराधाताई पौडवाल यांना शनि जयंती निमित्त शिंगणापूर व बेलापूर भेटीचे निमंत्रण
प्रसिद्ध पार्श्वगायीका अनुराधाताई पौडवाल यांना शनि महाराज जयंती निमित्त बेलापुर व शनि शिंगणापूर येथे भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले असुन या निमंत्रणाचा त्यांनी स्विकार केला असल्याची माहीती बेलापुर येथील शनि मंदिराचे पुजारी दिपक वैष्णव यांनी दिली आहे शनि महाराजांची जयंती १९ मे रोजी येत असुन त्या निमित्ताने आपण अहमदनगर जिल्ह्यात येवुन शनि शिंगणापूर तसेच पुरातन बेलापुर येथील शनि मंदिरास भेट द्यावी अशी विनंती शनि शिंगणापूरचे पोलीस पाटील अँड .सयाराम बानकर व बेलापुर शनि मंदिराचै पुजारी दीपक वैष्णव यांनी मुंबई येथील अनुराधाताई पौडवाल यांच्या घरी जावुन शनि मंदिरास भेट देण्याचे निमंत्रण दिले शनि शिंगणापूर येथील शनि महात्म्य सर्वांना माहीत आहे त्याच बरोबर श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे शनी महाराजाची एकमेव मूर्ती असुनअतिशय जागृत असे हे देवस्थान आहे त्यामुळे मूर्ती रुपात असणाऱ्या बेलापुर येथील शनि मंदिरासह आपण भेट द्यावी अशी विनंती मदिंराचे पुजारी दिपक वैष्णव व रामभाऊ जगताप यांनी केली या वेळी बोलताना अनुराधाताई पौडवाल म्हणाल्या की शनि महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा योग खऱ्या अर्थाने आज आलेला आहे शनि महाराजाचे दोन्ही भक्त पुजारी शनि महाराजांच्या भेटीचे निमंत्रण घेवुन आलेले आहे बहुधा शनि देवानेच त्यांना माझ्याकडे पाठविले असावे त्यामुळे शनि जयंतीला मी शनि महाराजांचे दर्शन घेण्याकरीता शिगंणापूर तसेच बेलापुर येथे येणार असल्याचे त्या म्हणाल्या