माझ्या वडिलांचे निस्वार्थी विकास कामे – आदिक कन्येच्या हस्ते गोविंद सागराचे जलपूजन

माझ्या वडिलांचे निस्वार्थी विकास कामे – आदिक कन्येच्या हस्ते गोविंद सागराचे जलपूजन
टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी माझ्या वडिलांचे मोठे योगदान आहे.
ते कुठलीही विकास काम असो निस्वार्थपणे करीत होते. असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे. गुरुवारी गोविंद सागर टाकळीभान(टेलटँक) जलपूजन अनुराधा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सन १९७२ मध्ये (कै.) खासदार आदिक यांच्या प्रयत्नातून गोविंद सागराची निर्मिती झाली. आणि परिसराला गेल्या पन्नास वर्षांपासून संजीवनी मिळाली. मात्र आम्ही येथे थांबत नाही असे अजूनही आमच्याबाबत गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे. तालुक्याच्या विकासाकरीता मोठे विधायक काम करायचे असेल तर वरिष्ठ पातळीवर वेळ द्यावा लागतो. आणि तेच काम अविनाश आदिक हे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास बोरूडे, बापूसाहेब पटारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक देवदास कोकणे यांनी तर आभार जयकर मगर यांनी मानले.
शहराध्यक्षा अर्चना पानसरे, सुनील थोरात, जयंत चौधरी, आदित्य आदिक, अभिमन्यू भिंगारवाला, शिवसेना तालुका अध्यक्ष दादासाहेब कोकणे, केरूबापू मगर, प्रा. दिलीप कोकणे, कार्लस चाटे, बापूसाहेब शिंदे, किरण धुमाळ, कृष्णा वेताळ, आबासाहेब रणनवरे जलसंपदा विभागाचे महेश शेळके व बाळासाहेब कोकणे उपस्थित होते.