राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या कार्यकर्त्यांनी गोमांस विक्री करणाऱ्यास केले विरगाव पोलिसांच्या स्वाधीन

राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या कार्यकर्त्यांनी गोमांस विक्री करणाऱ्यास केले विरगाव पोलिसांच्या स्वाधीन
वैजापूर तालुक्यातील हमरापुर येथे गोमांस विक्री करण्याकरता एक अज्ञात व्यक्ती येत असल्याची गुप्त माहिती राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग तालुका श्रीरामपूर यांना मिळाली लागलीच त्यांनी ही माहिती त्यांचे कट्टर हिंदू धर्म रक्षक रवींद्र पवार व त्यांचे सहकारी अक्षय भराडे दादा पाटील भराडे प्रवीण भोसले निलेश तोडमल नितीन भराडे नितीन खपके यांना दिली.व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी हमरापुर येथे सापळा रचून आरोपी हबीब युसुफ कुरेशी याचा पाठलाग केला मात्र तो तिथून बाजाठाण येथे पळून आला मात्र तिथे त्याला राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी पकडले व पोलीस पाटील विजय भराडे यांना कळून विरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय वाघमोडे साहेब यांना कल्पना देण्यात आली.
त्यांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला गोदातीरी वसलेले या पावन भूमीला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांची परंपरा असलेला हा भाग ब्रह्मलीन सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज परमपूज्य श्रद्धेय हिंदू धर्म रक्षक ह भ प हिंदू धर्म रक्षक योगी रामगिरीजी महाराज पीठाधीश गोदा धाम सरला बेट परंपरा आज तागायत चालू आहे परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज जीवाचे रान करून अखंड हिंदू राष्ट्रात धर्माची पताका खांद्यावर घेऊन हिंदू धर्माचा प्रचार करत आहे.
गोमातेला राज्य मातेचा दर्जा मिळाला असून तरीदेखील महाराष्ट्रात असे कृत्य होणे निंदनीय आहे गुन्ह्यात वापरलेली MH 20 HA,,8379 ही गाडी देखील ताब्यात घेतली असून आरोपी याच्याकडे 16 हजार रुपये तसेच 50 हजार ते 60 हजार रुपये किमतीचे गोमास आढळून आले.