ब्रेकिंगमहाराष्ट्र

शुक्रवार चा मुख्य बाजार अक्षय कॉर्नर, संजीवनी हॉस्पिटल याठिकाणावरून हलवून म्हाडा वसाहती मध्ये भरवण्याचा  घाट   सागर भैय्या बेग यांच्या मध्यस्थीने थांबवला

शुक्रवार चा मुख्य बाजार अक्षय कॉर्नर, संजीवनी हॉस्पिटल याठिकाणावरून हलवून म्हाडा वसाहती मध्ये भरवण्याचा  घाट   सागर भैय्या बेग यांच्या मध्यस्थीने थांबवला.

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी):-अनेक वर्षांपासून भरणारा शहराचा शुक्रवार चा मुख्य बाजार अक्षय कॉर्नर, संजीवनी हॉस्पिटल याठिकाणावरून हलवून म्हाडा वसाहती मध्ये भरवण्याचा पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा घाट स्थानिक रहिवाशी व व्यापाऱ्यांनी धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांच्या मध्यस्थीने शांततेत थांबवला.भागातील स्थानिक साडे तीनशे नागरिकांनी सह्यांचे निवेदन देऊन पूर्वीच्याच ठिकाणी बाजार भरवण्यास काहीही हरकत नसल्याचे निवेदन सागर बेग यांच्या हस्ते मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप यांना दिले.

 

        पालिकेत जाऊन मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप यांना मोरगे वस्ती परिसरात राहणाऱ्या स्थानिक साडे तीनशे रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन देऊन मुख्याधिकाऱ्यांशी या विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक लोकांना कोणालाही या आठ दिवसांनी भरणाऱ्या बाजाराचा त्रास नाही फक्त मोरगे वस्तीवरील आतील जाण्यायेण्याच्या रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना मध्यभागी बसू न देण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. 

 

         मागील दहा दिवसापासून चालू असलेला बाजारातील व्यापाऱ्यांचा जागेचा प्रश्न अखेर सागर भैय्या बेग यांच्या प्रमुख मध्यस्थीने मिटल्याने स्थानिक रहिवाशी व व्यपाऱ्यांनी सागर बेग यांचे आभार मानले आहेत.कोणीतरी असंतुष्ट तक्रार करतो त्यावरून पालिका कारवाई करते हे योग्य नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.अनेक वर्षांपासून भरणारा हा बाजार महिलांसाठी सुरक्षित असून म्हाडा वसाहत याठिकाणी बाहेर गावाहून येणाऱ्या शेतकरी बांधवांचे व व्यपाऱ्यांचे धंदे देखील झाले नसते असे व्यपाऱ्यांनी आपल्या व्यथा याप्रसंगी सागर बेग यांच्या समक्ष मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडल्या निवेदनातील सर्व मागण्या मान्य करून बाजार पूर्वीच्याच ठिकाणी भरेल कोणालाही त्रास होणार नसल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

 

          याप्रसंगी राजेश वाव्हाळ, सुनील पाचोणे, नितीन शिररसाठ, यांच्यासह असंख्य व्यापारी व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे