निधन वार्ता कै.नामदेव शेगर
येथील डवरी गोसावी समाजातील जेष्ठ कार्यकर्ते नामदेव नारायण शेगर यांचे -हदय विकाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी मुलगा सुन चार मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.
भिक्षा मागणे बहुरुपी कामं करणे वापरात राहुन भटकंती करुन उपजिविका करणे असा यांचा दिनक्रम परंतु नामदेवराव शेगर हा दुरदृष्टीचा माणुस यांनी चार भावांना बरोबर घेऊन घोडेगाव येथे चांदा रोडवर चौकात तिस वर्षांपूर्वी तिस गुंठे जमिन खरेदी केली ती पै पैसा भिक्षा मागूनच.तेव्हापासुन ते चार भावंडासह घोडेगाव येथे स्थायिक झाले. त्यांनी सात गाळ्यांचे व्यवसासाठी नारायण काॅम्प्लेक्स उभे केले आणि समाजापुढे आदर्श निर्माण केला.
त्यांचे जावई मुंबई,मालेगाव,नगर ,चांदा येथे नोकरी व्यवसाय करत आहेत .नामदेवराव हे म्हशीचे व्यापारी बाबाजी शेगर यांचे वडिल होत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा