सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी केलेल्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी.
टाकळीभानच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी केलेल्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी
टाकळीभानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगम मताने १४ वा वित्त आयोग, १५ वित्त आयोग, दलित वस्ती योजना व ग्रामनिधीत मोठा गैरव्यवहार केला असल्याने या गैरकारभाराची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या कविता मोहन रणनवरे, छाया योव्हान रणवरे व युवक कार्यकर्ते मल्हार नवरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा अपहर केलेला आहे. सदस्यांना बैठकीत कोणतीही माहिती न देता परस्पर न केलेल्या कामाची ही बिले काढलेली आहेत. १५व्या वित्त आयोगातून म्हैसमाळे ते बाळासाहेब शिंदे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर पिवर ब्लॉक न टाकता पावणेचार लाखाची रक्कम काढून घेतली आहे. पोलीस स्टेशन बंदिस्त गटार सुमारे दोन लाखाचे काम झालेले नसताना पैसे लाटले आहेत. तसेच दिवाबत्तीसाठी लाखोंचा खर्च संशयास्पद आहे. अंगणवाडी, शौचालय दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याच्या टाकीसाठी मोठा खर्च दाखवण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून लाखो रुपयांचे संशयास्पद खर्च दाखवले आहेत. अंगणवाडी इमारत दुरुस्तीचा खर्च संशयित आहे. मातंगवाडा चौक सुशोभीकरणासाठी पाच लाख ८९ हजारचा अवास्तव खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहे. चौदाव्या वित्त आयोगातून ऑफिस दुरुस्तीसाठी दहा लाखाचा खर्च दाखवला आहे.
दलित वस्ती योजनेतही निधी वापरात गैरव्यवहार झालेला आहे. तर ग्रामनिधीतून २०२० ते २०२४ या आर्थिक वर्षात अनेक बोगस बिले टाकून निधी हडप केला आहे. ग्रामनिधीतून मागासवर्गीय लाभार्थी, महिला बालकल्याण, दिव्यांग यासाठीच्या निधीचा गेल्या चार वर्षात खर्च न करता कर्तव्यात कसूर केला आहे. इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती, चल वाहिनी लिकेज काढणे, डिझेल यावर अवस्तव खर्च करून निधी लाटलेला आहे. अनेक विकास कामावर संशयास्पद खर्च केल्याचे दाखवून मोठ्या रकमा हडप केले आहेत. सरकारी जागेवरील अतिक्रमणाच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तर लावून मोठी मलाई गोळा केली आहे. यासाठी नमुना नं. ८ ला खाडाखोडी करण्यात आलेले आहेत.
सन २०२१ ते २०२४ या कालावधीत १४ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती, ग्रामनिधी, पाणीपुरवठा या कामात सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगमने निधीचा मोठ्या प्रमाणात अपार करून व संबंधित यंत्रणेकडून निकृष्ट कामे करून घेऊन बिले काढून भ्रष्टाचार केल्याचे दिसत असल्याने झालेल्या कामांचे फेरमुल्यांकन व्हावे. व संगनमताने निधीच्या केलेल्या अपराशी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९/१ व ३९/२ मधील तरतुदीनुसार सरपंच यांची पद काढून त्यांना अपत्र करावे, तर ग्राम विकास अधिकारी यांना बडतर्फ करून अपहरची घांची संयुक्तिक जबाबदारी निश्चित करून अपहरची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आल्याने ग्रामपंचायतिला घरचा आहेर देण्यात आला आहे.