पञकारांचे गावच्या विकासात मोलाचे योगदान
पञकारांचे गावच्या विकासात मोलाचे योगदान
येथील पञकारांचे गावच्या विकासात मोलाचे योगदान आहे. गावपुढार्यांच्या कामकाजावर पञकारांचे बारीक लक्ष आसल्याने गुण दोषांचे मुल्यमापन ते बातमीच्या माध्यमातुन सतत करीत आसतात. माञ गावाच्या विकासात महत्वाची भुमिका बजावणार्या या घटकाकडे दुर्लक्ष होत आहे. पञकार भवनाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबीत आसल्याने पञकार भृवनासाठी नेहमी पञकारांसोबत आहे असे प्रतिपादन राजेंद्र कोकणे यांनी पञकारांसाठी काढलेल्या विमा पाॕलिसी वितरण प्रसंगी बोलताना केले.
पञकारांना धकाधकिच्या युगात स्वतःकडे लक्षद्यायला वेळ मिळत नसल्याने पञकारांच्या बाबतीत अघटीत घटना घडली तर कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने माजी उपसरपंच तथा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी टाकळीभान पञकार सेवा संस्थेच्या सर्व सदस्यांचा स्वखर्चाने विमा करुन पञकारांना विमा कवच दिले आहे.
टाकळीभान येथे विविध वृत्तपञ, वृत्तवाहीनी, छायाचिञकार व वृत्पञ विक्रेते यांनी संघटन करुन पञकार सेवा संस्थेची स्थापना केलेली आहे. नुकतेच या पञकार सेवा संस्थेच्या दोन सदस्यांचे आपृघाती निधन झाले. माञ त्यांचे विमा संरक्षण नसल्याने मृत्यानंतर वारसाला कोणतीही भरपाई मिळाली नाही. हाच धागा पकडुन राजेंद्र कोकणे यांनी समाजाच्या भल्यासाठी सदैव धडपड करणाऱ्या पञकारांसाठी विमा कवच देण्याची संकल्पना मांडली व ती प्रत्यक्षात उतरवली. काल सर्व पञकारांना सन्मानपुर्वक विमापाॕलिसीचे सन्मान पुर्वक वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र कोकणे, प्राचार्य जयकर मगर, प्रा.कार्लस साठे, श्रीधर गाडे, बंडोपंत बोडखे, रामनाथ माळवदे, दादासाहेब कापसे, गजानन कोकणे, विष्णुपंत पटारे, विशाल पटारे, शरद रणनवरे, अमृत बोडखे, मधुकर गायकवाड, सुबोध माने आदिंसह सर्व पञकार उपस्थित होते. यावेळी पञकार सेवा संस्थेच्या वतीने कोकणे यांचा सत्कार करण्यात आला