नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

अखेर टाकळीभानचे ग्रामविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर.

अखेर टाकळीभानचे ग्रामविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर.

टाकळीभान येथील आर. एफ. जाधव ग्रामविकास अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर , मुरकुटे व विखे गटाचे ठिय्या आंदोलन मागे,

    ग्रामविकास अधिकारी जाधव यांची बदली बाबत अनेक वेळा तोंडी किंवा लेखी तक्रार करून देखील त्यांची बदली करण्यात आलेली नाही.

 

सदर ग्रामविकास अधिकारी यांची बदली त्वरित करण्यात यावी अन्यथा २२/१२/२०२२ रोजी आपल्या दालनात ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात येईल असे निवेदन मुरकुटे – विखे गटाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते.

 

     ग्रामविकास अधिकारी जाधव हे सलग दहा वर्षांपासून एकच गावात कार्यरत कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या मनमानी कारभार करण्याची पद्धत तसेच ग्रामविकास अधिकारी अनेकवेळा कार्यालयात हजार नसतात, तसेच सुचवलेले कामांकडे दुर्लक्ष करतात अशी ग्रामस्थांनी सरपंच व गावातील जेष्ठ पुढारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्याच अनुषंगाने हे निवेदन दोन्ही गटांच्या वतीने देण्यात आले होते. ग्रामविकास अधिकारी हे गावात गटा-तटाचे राजकारण करून गावात तेढ निर्माण करू पाहत असल्याचा आरोप दोन्ही गटांच्या वतीने करण्यात आला आहे. आठ दिवसांच्या आत बदली न केल्यास कुठल्याही परिस्थितीत आंदोलनावर ठाम असल्याचे दोन्ही गटांचे म्हणणे होते. जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत सर्व कामकाज बंद ठेवणार असल्याचे सरपंच अर्चना रणनवरे यांनी सांगितले होते. त्याच अनुषंगाने मुरकुटे – विखे गटाच्या वतीने पंचायत समिती श्रीरामपूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला होता त्या आंदोलनाला अखेर यश मिळाले.

      गटविकास अधिकारी यांनी आंदोलनकर्त्याना संबोधित करताना सांगितले की, ग्रामविकास अधिकारी जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चार ते पाच अधिकाऱ्यांची समितीची नेमणूक करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण होताच त्याचा अहवाल अहमदनगरचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांच्या जागी तोपर्यंत दुसऱ्या अधिकाऱ्यांना नेमणूक देण्यात येईल असे सांगून आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यास विनंती केली.

       यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, माजी सभापती नानासाहेब पवार, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी व्हाइस चेअरमन दत्तात्रय नाईक, ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे , यशवंत रणनवरे, सुनील बोडखे, किशोर मैड, किशोर गाढे, अशोक कचे, रमेश धुमाळ, शंकर पवार,, रमेश पटारे, दीपक पवार, संजय रणनवरे, दत्तात्रय मगर, रावसाहेब वाघुले, संजय पटारे, मल्हार रणनवरे, शिवाजी पवार, शिवाजी पटारे, भाऊसाहेब पटारे, भैय्या पठाण, बाळासाहेब आहेर, उत्तम पवार, विकास मगर, महेश लेलकर, अशोक लेलकर, संदीप कोकणे, मच्छिंद्र कोकणे, अनिल बोडखे, भागवत रणनवरे, सुभाष येवले, काकासाहेब रणनवरे, उत्तम रणनवरे, सिद्धार्थ बोडखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे