
सोनई पोलिसांकडून नाकाबंदी करून विनापरवाना वाहनावर कारवाई
सोनई पोलीस ठाणे कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (काल) नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी दुचाकी वाहनांना विना नंबर प्लेट, कागदपत्रांची तपासणी, विनाहेल्मेट आदी कारणावरून दुचाकी वाहन धारकांना दंड ठोठावण्यात आला. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची
तपासणी पोलिसांकडून केली जात होती. डॉ. आंबेडकर चौकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली. यावेळी अनेक वाहनधारकांची धावपळ झाली. अनेकांच्या दुचाकी वाहनांच्या चाव्या काढून घेण्यात आल्या व
पोलीस स्टेशनला गाड्या जमा करण्यात आल्या. विना नंबर प्लेट, वाहन परवाना, आर. सी बुक इत्यादींची पडताळणी व तपासणी करण्यात आली. नाकाबंदी ही चोरीचे वाहने तपासणी साठी केली असल्याचे सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी सांगितले.