स्व मालकिच्या जागेवरुन प्रलंबीत आसलेला घरकुलांचा प्रश्न आता शासन निर्णयामुळे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा

स्व मालकिच्या जागेवरुन प्रलंबीत आसलेला घरकुलांचा प्रश्न आता शासन निर्णयामुळे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा
टाकळीभान येथील गेली अनेक वर्षे स्व मालकिच्या जागेवरुन प्रलंबीत आसलेला घरकुलांचा प्रश्न आता शासन निर्णयामुळे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आसुन शासकिय गायरान व ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करुन रहाणार्या पाञ लाभार्थ्यांचा रहात्या जागेवर घरकुल बांधुन देणार आसल्याची माहीती टाकळीभानचे उपसरपंच कान्हा खडागळे यांनी दिली आहे.
याबाबत माहीती देताना खंडागळे म्हणाले कि, मौजे टाकळीभान येथील बर्याच वर्षापासून प्रलंबित असलेला घरकुलांचा प्रश्न महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभागाकडील दिनांक २२ आॕगष्ट २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुटणार आहे. यासाठी सर्वांसाठी घरे २०२४ हे राज्य शासनाचे धोरण ग्रामपंचायत राबविणार असून प्रधानमंत्री आवास योजनेतील ब व ड यादीतील कच्या घरात राहणार्या पात्र लाभार्य्थांनी गायरान व ग्रामपंचायत सरकारी जागा या ठिकाणी वास्तव्य करुन राहणार्या लाभार्य्थांना याचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्याची ग्रामपंचायत दप्तरी कच्या घराची नोंद आसने आवश्यक आहे. त्यानुसार पहिल्या १०० घरकुलांचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. तर उर्वरित पाञ लाभार्य्थांनाही टप्या – टप्याने लवकरच घरे देण्यात येऊन त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यत येईल. डिसेंबर २०२४ पर्यत एकही पात्र लाभार्थी घरापासून वंचित राहणार असा आराखडा टाकळीभान ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत आसुन पुढील आठ – दहा दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या राहण्याच्या जागेचे स्थळ निरीक्षण करुन वस्तुस्थिती जाणुन घेतली जाईल. या सर्व घराचा मास्टर प्लॕन व आराखडा तयार करुन घरकुल योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी यावेही माहीती देताना सांगितले.
टाकळीभान येथील सरकारी गट नंबर ३२, गट नंबर ९५, गट नंबर १८९, गट नंबर २४५, गट नंबर २८६, गट नंबर २८७ या सरकारी गटातील जागेवर म्ठ्या प्रमाणात मानवी वसाहत बसलेली आहे. या गटातील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे लवकरच या सर्व सरकारी गटातील अतिक्रमणं कायम होऊन हे गट गावठाणाकडे वर्ग केले जाणार आसल्याने या सर्व गटातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना राहत्या जागेवरच घरकुलचा लाभ देता येईल अशी माहितीही उपसरपंच कान्हा खंडागळे यानी दिली.