51 फूट धर्मध्वज उभारणी व अनावरण तसेच अखंड हरिनाम सप्ताह वांगी बुद्रुक खुर्द मोठ्या जल्लोषात सुरुवात

51 फूट धर्मध्वज उभारणी व अनावरण तसेच अखंड हरिनाम सप्ताह वांगी बुद्रुक खुर्द मोठ्या जल्लोषात सुरुवात
अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वांगी बु// वांगी खुर्द वर्ष (२४) वे. श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व भागातील वांगी बुद्रुक वांगी खुर्द येथे होत असलेल्या,
जागृत देवस्थान विरभद्र बिरोबा महाराज यात्रा उत्सव निमित्ताने राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर भैय्या बेग यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वतः वांगी बुद्रुक बिरोबा देवस्थान समोर 51 फूट धर्म ध्वज उभारून त्याचे आज सकाळी अनावरण करण्यात आले.
होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला मोठ्या उत्सावात सुरुवात झाली आहे ह.भ.प.महंत प.पू गुरुवर्य शांतीब्रम्ह भास्करगिरीजी महाराज (श्री श्रेत्र देवगड संस्थान) यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हे.भ.प.स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज (श्री श्रेत्र देवगड) ह.भ.प.अर्जुनजी नामदेव महाराज (श्रीराम मंदिर आदिलाबाद तेलंगणा) ह.भ.प. मच्छिंद्र महाराज चोरमले (शाश्री) ह.भ.प.हरी महाराज पिसाळ ह.भ.प. यशोदानंद महाराज माने ह.भ.प.योगेश महाराज होन (आळंदी देवाची) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे .
तरी पंचक्रोशीतील परिसरातील भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहात उपस्थित राहुन सप्ताहाचां लाभ घ्यावा अशि वीनंती सप्ताह कमिटीने केली आहे शनिवार २८/१/२०२३ रोजी सप्ताहाला सुरूवात होत असुन दैनिक कार्यक्रम सकाळी पहाटे ४ ते ६ काकड आरती ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम ७ ते ११ श्री ग्रंथराज पारायण त्या नंतर महाप्रसाद सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ रात्री ७ ते ९ विवीध तिर्थक्षेत्रातील गुणीजन महाराज यांचेेभव्य किर्तन महोत्सव हरिकीर्तन त्यानंतर ९ ते १० महाप्रसाद होत आहे.
तरी या जाहिर हिर हरिकीर्तनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वांगी बु// वांगी खुर्द च्या ग्रामस्थांकडून होत आहे. धर्म ध्वज अनावरंप्रसंगी वांगी बुद्रुक, वांगी खुर्द सर्व ग्रामस्थ तसेच प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय श्रीराम संघ संस्थापक सागर भाऊ बेग राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष आकाश बेग
राष्ट्रीय श्रीराम संघ अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख सागर शेटे महेश गायकवाड मोहन आढागळे संघर्ष दिघे अजिंक्य काथे गणेश राऊत दीपक गिळे ललित राऊत सागर ओटी रुद्रा डिजिटल न्यूज तसेच जनक्रांती न्यूज चे मुख्य संपादक नारायण चोरमले आदी उपस्थित होते