बेलापुरातील पहीले न्यायाधिश दाम्पत्य होणाचा बहुमान मिळविणाऱ्या सातभाई कुटुंबीयांचा बेलापुर सेवा संस्थेच्या वतीने सत्कार

बेलापुरातील पहीले न्यायाधिश दाम्पत्य होणाचा बहुमान मिळविणाऱ्या सातभाई कुटुंबीयांचा बेलापुर सेवा संस्थेच्या वतीने सत्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामर्फत घेण्यात आलेल्या दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायाधीश पदी बेलापुर येथील न्यायाधिश शैलेश राजेंद्र सातभाई यांच्या पत्नी वर्षाराणी यांची नियुक्ती झाली असुन बेलापुर व परिसरात पहीले न्यायाधिश दाम्पंत्य होण्याचा बहुमान सातभाई कुटुंबीयांनी मिळवीला असुन बेलापुर सेवा संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला ,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सिव्हील जज व ज्यूडीशिअल मँजिस्टेट फस्ट क्लास या पदाकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेत येथील प्रगतशिल शेतकरी राजेंद्र सातभाई यांचे चिरंजीव शैलेश सातभाई यांनी महाराष्ट्रात ५८ वा क्रमांक मिळविला होता स्वतः न्यायाधिश झाल्यानंतर आपली पत्नी वर्षाराणी हिलाही न्यायाधिश होण्यासाठी प्रेरणा दिली नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत पास होवुन वर्षरानी शैलेश सातभाई या ही आता न्यायाधिश बनल्या आहेत.
या बद्दल बेलापुर सेवा सस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले यांनी त्यांचा सन्मान केला या वेळी संचालक शेषराव पवार दत्ता कुऱ्हे बाळासाहेब लगे अंतोन अमोलीक संजय रासकर राजेंद्र सातभाई जालींदर कुऱ्हे शैलेश सातभाई कलेश सातभाई सखाराम टेकाडे आदि उपस्थित होते