ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

लवकरच मतदारसंघातील उर्वरित पाणंद रस्त्यांचा प्रश्नही लागणार मार्गी लागणार – आ. रोहित पवार 

*मातोश्री शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत मंजूर असलेल्या कामांना निधी उपलब्ध करण्याबाबत आ. रोहित पवार यांनी घेतली रोहयो मंत्र्यांची भेट*

 

लवकरच मतदारसंघातील उर्वरित पाणंद रस्त्यांचा प्रश्नही लागणार मार्गी लागणार – आ. रोहित पवार 

 

कर्जत प्रतिनिधी – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांची भेट घेतली आहे. मतदारसंघातील प्रलंबित शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागावी याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या दोन वर्षात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून पहिल्या ३ टप्प्यात दीड हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. 

 

अशातच चौथ्या टप्प्यातील प्रत्येक गावामध्ये ४ ते ५ रस्ते शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रस्तावित केले होते. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर त्या-त्या संबंधित ग्रामपंचायतीला वर्क ऑर्डरचे वितरण देखील करण्यात आले होते. यामध्ये चौथ्या टप्प्यात १६३१ किमीच्या ९३७ कामांचा समावेश आहे. या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्याबाबतची मागणी आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांना भेटून केली आहे. 

 

आतापर्यंत मतदारसंघात पूर्ण झालेल्या दीड हजार किमी पाणंद रस्त्यांचा फायदा हा दोन्ही तालुक्यातील १ लाख ८० हजार नागरिकांना होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच येत्या काळात उर्वरित सर्व पाणंद रस्ते देखील पूर्ण करून मतदारसंघातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सतत प्रयत्न करत राहणार असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे, शेतात जाणे, तसेच वाड्या-वस्त्यांवर राहणारे नागरिक, शालेय विद्यार्थी व रुग्ण या सर्वांची होणारी गैरसोय कायमची मार्गी लागत आहे. सत्तेत नसतानाही आमदार रोहित पवार यांनी आपल्या कामाचा सपाटा हा नेहमीप्रमाणे कायम ठेवला असल्याचं या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. तसेच मतदारसंघातील विकासकामांसाठी आणि प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी ते कायमच पुढाकार घेत संबंधितांकडे वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करत असतात. सर्व टप्पे मिळून तब्बल 3 हजार किमीचे महाराष्ट्रात सगळ्यात मोठे पाणंद रस्त्याचे काम हे कर्जत-जामखेड मतदारसंघात येत्या काळात पाहायला मिळेल.

 

 

चौकट – 

 

पाणंद रस्त्यांचे कामे ग्रामस्थांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत लोकांनी व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , ग्रामसेवक, सर्व अधिकारी, महसूलचे प्रांताधिकारी, तहसीलदार या सर्वांनी सहकार्य केलं म्हणून १ लाख ८० हजार सामान्य लोकांना आपण न्याय देऊ शकलो. काही लोक वेगळ्या प्रकारे यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मी मंजूर केलेली कामांना स्थगिती देऊन ती त्यांनी केली, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु लोकांना सर्व गोष्टी माहिती असतात. त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत आणि मंत्री महोदयांनी याबाबत आश्र्वासित केले आहे. 

 

आ. रोहित पवार (कर्जत – जामखेड)

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे