सावधान आपण बिबटप्रवण क्षेत्रात आहात या भागात वावरताना घ्यावयाची काळजी*
सावधान आपण बिबटप्रवण क्षेत्रात आहात या भागात वावरताना घ्यावयाची काळजी*
वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा प्रादेशिक यांचे कडुन जनहितार्थ *सावधान आपण बिबटप्रवण क्षेत्रात आहात या भागात वावरताना घ्यावयाची काळजी*
श्रीगोंदा तालुक्यात बिबट्या याचा सातत्याने जनतेचे सामना होत असल्याने कारणाने रविंद्र भोंगे वन परिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा आहे विशेष खबरदारी घेण्यासाठी आव्हान करण्यात आले की . बिबट्या दिसल्यास त्याच्या मागे पळू नये किंवा त्याचा पाठलाग करू नये अशा वेळी तो हल्ला करण्याची शक्यता असते. बिबट्या दिसला तर त्याचे मोबाईल वर चित्रीकरण करण्यासाठी जाऊ नये. बिबट्याच्या अति जवळ जाणे त्याने हल्ला केल्यास जीवघेणे ठरणारे असते. ज्या भागात बिबट्यांचा वावर आहे अशा भागात सायंकाळ नंतर एकटे फिरू नये किंवा लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये,बाहेर अंधारात उघड्यावर शौचायला जाऊ नये.रात्री शेतात पाणी देण्यास किंवा बाहेर जावे लागले तर सोबत जाड घुंगरे लावलेली काठी,विजेरी बाळगावी किंवा तीन चार च्या संख्येने जावे. निर्जन ठिकाणी एकट्याने जावे लागल्यास जाताना घरातील लोकांना कुठे जात आहात, किती वेळ लागणार आहे याची माहिती द्या. जाताना मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवत ठेवा,घराला चिकटून ऊसाचे क्षेत्र नसावे. यात सुरक्षित अंतर ठेवावे कारण बिबट्या ऊसात लपून बसलेला असतो. माळरानात गुरे चारावयास नेताना शक्यतो एकटे जाऊ नये. गुरांना नजरेच्या टप्प्यात ठेवावे. पाळीव जनावरांचे गोठे घरापासून थोडे दूर बांधून त्याला व घराच्या परिसराला मजबूत कुंपण करावे. घरच्या अंगणात व गोठ्यात शक्यतो सायंकाळ नंतर दिवे सुरु ठेवता येतील याची व्यवस्था करावी.शेतात पाणी भरण्यासाठी जाताना फटाके फोडावेत बिबट्या अचानक समोर दिसला तर घाबरून जाऊ नये.तसेच त्याच्या वाट्यास जाऊ नये. तो स्वताहून माणसांवर हल्ले करत नाही. बिबट्या विहिरीत पडला असेल किंवा कुणाच्या घरात शिरला असेल तर तिथे गर्दी करू नये. वन विभागाच्या कर्मचार्यांना त्यास तेथून काढताना अडचणी निर्माण होतात. अशावेळी गर्दीच्या गोंगाटाने बिथरलेला बिबट्या पळताना जमावावर हल्ला करू शकतो. बिबट्याची पिल्ले शेतात सापडल्यास त्यास उचलून आणू नये. मादी येऊन ती घेऊन जाते. आपण उचलून आणल्यास पिल्लांमुळे सैरभैर झालेली मादी माणसांवर हल्ला करू शकते.अशी सापडलेली पिल्ले आपण उचलून आणून आपण त्यांस जीवदान दिले अशी लोकांमध्ये भावना असते परंतु आपल्या अशा करण्याने त्यांची आई पासून ताटातूट होते. यामुळे हि पिल्ले फार काळ जगत नाहीत. बिबट्या दिसल्यास तत्काळ जवळच्या वनविभागाला माहिती द्यावी वन विभाग,रुग्णवाहिका,पोलिस तसेच आसपासच्या वस्तीवरील लोकांचे दूरध्वनी क्रमांक जवळ ठेवा. अनावधानाने काही घटना घडल्यास पटकन एकमेकांशी संपर्क साधता येतो. वस्ती जवळ रात्री बिबट्या आढळून आल्यास फटाके वाजवून पळवून लावावे.वन्य प्राणी आपला सहजीवी आहे,आपणच थोडी काळजी घेतली तर आपला बिबट्यांचा उभा ठाकलेला संघर्ष निश्चितच कमी होईल. अनाधानी बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास वनविभागाकडून त्या परिवारास व्यक्ती मृत झाल्यास पंधरा लाख रुपये, जखमी झाल्यास उपचारा चा खर्च देण्यात येते. पाळीव जनावरे मारली गेल्यास त्या शेतकऱ्यास आर्थिक मदतीचीही तरतूद आहे.मदतीसाठी खालील फोन नंबरवर संपर्क साधावा वन विभाग आपल्या मदती साठी सदैव तत्पर आहे घालमे वनपाल श्रीगोंदा मो नंबर ९६६५६०७५८५ पोटकुळे वनपाल उक्कडगाव मो नं ८०१०३२४७६४ गुंजाळ वनपाल मांडवगण मो नं९५७९२२५५०३ तसेच वन रविंद्र भोंगे परिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा