गुन्हेगारीब्रेकिंग

राहुरीमध्ये १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी गजाआड..        

राहुरीमध्ये १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी गजाआड..

       

 

 

१२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी गजाआड..!!

 

राहुरी- : १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे स्टील चोरीच्या बातमीची हकीकत अशी की, राहुरी पोस्टे गु.र.नं ११५६ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपी व मुद्देमाल तात्काळ शोध घेणेबाबत मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधिक्षक सो अनगर व श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर भाग यांनी पोनि / प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. सदर आदेशाप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनकडील पोनि / प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणेत आली आहे.

 

      नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनकडील कारवाई करणेकामी पोसई खोंडे, सफौ/चंद्रकांत ब-हाटे, पोहेकॉ/दिनकर चव्हाण, पोहेकॉ / सोमनाथ जायभाय, पोना/ अमित राठोड, पोकों / अदिनाथ पाखरे, पोकों/सचिन ताजणे, पोकों / संतोष राठोड, पोकों/गणेश लिपणे, पोकॉ/नदिम शेख .पोकॉ/ अमोल पडोळे यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते.

 

       सदर बाबत पो.नि.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी नामे १) अभिषेक बाबासाहेब हुडे २) हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा. उंबरे ता. राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे. गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व ३)जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे ४) छोट, उर्फ सौरभ संजय दुशिंग ५) राहुल दादु वैरागळ सर्व रा. उंबरे ता. राहुरी जि. अनगर असे आम्ही मिळुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुन मुद्देमाल १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, TATA कंपनीची ACE मॉडेलची गाडी हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.

 

     सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला सो, पोलीस अधिक्षक, अ.नगर श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग व श्री संदिप मिटके सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे