घोगरगावं रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा राज्य मार्ग ४४ वर रस्ता रोको आंदोलन करणार – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयुर पटारे.
घोगरगावं रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा राज्य मार्ग ४४ वर रस्ता रोको आंदोलन करणार – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयुर पटारे.
टाकळीभान हे मोठे लोकसंख्येचे गाव आहे. शेजारील गावातील अनेक नागरिक या ठिकाणी येतात. त्यात टाकळीभान – घोगरगाव हा मुख्य बाजारपेठेतील रस्ता आहे. ह्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे. परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक लोकांची दुचाकी वाहने घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक वेळा आंदोलन करून देखील अधिकारी याची दखल घेण्यासाठी तयार नाही.
लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा राज्य मार्ग ४४ वर टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केले जाईल असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
त्यावर येत्या आठवड्यातच ज्या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे त्याठिकाणी रस्ता खांदून त्याचे खडीकरण करणार व पाणी साचणार नाही अशी व्यवस्था करणार असल्याची ग्वाही दिली.
तसेच सदर रस्त्याचे ७ मीटर रुंद पर्यंत काँक्रिटीकरणचा प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले.
श्रीरामपूर नेवासा रोड वरील दुभाजकामुळे होत असलेल्या अपघात बाबत चर्चा केली. त्यावर लवकरच रस्त्यावर हजार्ड बोर्ड (रिफ्लेक्टर) बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे, अशोकचे संचालक भागवत रणवरे, लोकसेवा मंडळाचे उपाध्यक्ष आप्पासाहेब वाघुले ,सागर पटारे, आदी उपस्थित होते