बिंदुसरा धरणावर जीव धोक्यात घालून पर्यटन सुरूच; प्रशासन दुर्घटनेच्या प्रतिक्षेत आहे काय??
*बिंदुसरा धरणावर जीव धोक्यात घालून पर्यटन सुरूच; प्रशासन दुर्घटनेच्या प्रतिक्षेत आहे काय??
जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प यांना निवेदन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*
माजलगाव धरणात बुडालेल्या डाॅ.दत्तात्रय फपाळ यांचा शोध घेताना कोल्हापूर येथील केडीआरएफच्या पथकातील राज शेखर मोरे शहीद झाले. मात्र या घडनेतुन हौसी पर्यटक कोणताही बोध घेताना दिसत नाहीत. बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील भिंतीवर चालत तसेच धरणाच्या भिंतीवर बसुन फोटोसेशन करताना तसेच धरणामध्ये मासेमारी करताना सध्या बिंदुसरा धरण भरल्यामुळे पाहण्यासाठी आलेले पर्यटक जीवघेणे धाडस करताना दिसून येत आहेत.
दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची???
धरणाच्या सांडव्याशेजारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कडेला “सावधान प्रतिबंधक क्षेत्र “असा फलक लावण्यात आला असून अपघात,दुर्घटना अथवा जिवितहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार नाही कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक ३ बीड असा फलक लावण्यात आला आहे बीड ग्रामिण पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला असता जबाबदारी जायकवाडी प्रकल्प संबधितांची असल्याचे सांगितले जाते मग जबाबदारी कोणाची असा प्रश्न पडतो.
दुर्घटना घडल्यास संबधित आधिका-यांवर कायदेशीर कारवाई करा:-डाॅ.गणेश ढवळे
गेल्यावर्षी दि.१९ ऑक्टोबर २०२१ रोजी बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात बुडुन ओंकार लक्ष्मण काळे (वय १६ वर्षे)आणि शिव संतोष पिंगळे (वय १६ वर्षे)रा.शिंदेनगर कॅनाल रोड बीड यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यामुळेच प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पहात आहे का??भविष्यात दुर्घटना घडल्यास संबधित जबाबदार आधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक ३ यांना निवेदनाद्वारे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.