गट नंबर 250 मधीलअतिक्रमण न पडल्यास 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी ,जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण,
गट नंबर 250 मधीलअतिक्रमण न पडल्यास 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी ,जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण,
टाकळीभान येथील शासनाच्या मालकीच्या गट नंबर 250 मधील जागेवर सुरू असलेले आरसीसी पक्के अनाधिकृत बांधकाम न पाडल्यास 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा श्रीमती मंगल रामकृष्ण जाधव, यांनी दिला ,
जाधव त्यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे, की टाकळीभान येथील शासनाच्या गट नंबर 250 मध्ये, टाकळीभान पोस्ट ऑफिस समोर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस, विठ्ठल श्रीहरी कांबळे यांनी, आरसीसी पक्के बांधकाम सुरू केलेले आहे.तरी आपण आपल्या स्तरावरून सदरचे बांधकाम बंद करण्यात यावे, यासाठीचे निवेदन 25 जुलै 2022 रोजी दिलेले होते. त्या अनुषंगाने सदरचे बांधकाम हे आपल्या शासकीय स्तरावरून बंद करण्यात आले होते, परंतु सदरच्या इसमान हे बांधकाम परत सुरु केले आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी व आरोग्य केंद्राच्या पाठीमागील परिसरातील नागरिकांना जाण्या -येण्या साठी, व आपत्ती काळात अग्निशामक व अंबुलन्स जाण्यासाठी रोड शिल्लक राहत नाही, तरी आपण लवकरात लवकर आपल्या स्तरावरून अतिक्रमण काढून घ्यावे, व रस्ता मोकळा करावा.
तरी सदरचे शासकीय जमिनीवर होणारे बांधकाम काढून न घेतल्यास 2 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे.
अशा आशियाच्या अर्जाच्या प्रती माहितीस्तव मा. मुख्यमंत्री, मा. महसूल मंत्री, उच्च न्यायालय प्रांताधिकारी, तहसीलदार ,ग्रामीण पोलीस स्टेशन श्रीरामपूर, सरपंच, ग्रामविकास अधिकारी टाकळीभान यांना देण्यात आल्या आहे.