गणेश मंडळांनी सादर केलेल्या जिवंत देखाव्यांना नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद
गणेश मंडळांनी सादर केलेल्या जिवंत देखाव्यांना नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद
बेलापुर (प्रतिनिधी )-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त अजित गणेश उत्सवा निमित्त बेलापुरात जिवंत देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेस विविध गणेश मंडळाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या देखाव्या स्पर्धेकरीता रामेश्वर सोमाणी यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी रुपये ५००१/ सागर वर्मा मित्र मंडळाच्या वतीने द्वितीय क्रमंकासाठी रुपये ३००१/ तसेच अजित सहानी यांच्या वतीने तृतीय क्रमांकासाठी रुपये २००१/ लहानु उर्फ एकनाथ नागले, लखोटीया परिवार व शोएब शेख यांच्या वतीने उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये १००१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती . एकेकाळी नगर जिल्ह्यात जिवंत देखावे सादर करणारे गाव म्हणून बेलापुरगावाची ओळख होती परंतु ती कालबाह्य होत गेली त्यामुळे या गावात पुन्हा जिवंत देखाव्याचे सादरीकरण व्हावे अशी नागरीकांची अपेक्षा होती त्यामुळे बेलापुर ग्रामपंचायतीने देखावा स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला सिध्दिविनायक युवा मंचने दांडी यात्रा महात्मा गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह हा देखावा सादर केला तर हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळाने भारतीय सेनेने केलेले सर्जिकल स्ट्राईक हा देखावा सादर केला रामराज्य मित्र मंडळाने पायी दिंडी सोहळा हा देखावा सादर केला त्यात अनेक सामाजिक संदेश देण्यात आले होते .कुऱ्हे वस्तीवरील गौरी गणेश बाल मित्र मंडळाने सामाजिक बदल सन २०१९ते २०२१ हा देखावा सादर केला छत्रपती तरुण मंडळाचा अफजलखान वध हा देखावा काही कारणामुळे स्थगित झाला होता तो आज करण्यात येणार आहे पावसाने व्यत्यय आणल्यामुळे थोडासा विस्कळीतपणा झाला परंतु पावसात देखील नागरीक देखावा पहाण्यासाठी आले होते .या देखावा स्पर्धेचे परिक्षण बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे पत्रकार देविदास देसाई यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे दिलीप दायमा किशोर कदम अकबर टिनमेकरवाले तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी विशेष परिश्रम घेतले.बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे हरिष पानसंबळ निखील तमनर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.