रात्रीस खेळ चाले … श्रीगोंदा तालुक्यातील अवैध वाळू उपसा काही थांबेना…
रात्रीस खेळ चाले …
श्रीगोंदा तालुक्यातील अवैध वाळू उपसा काही थांबेना…
श्रीगोंदा तालुक्यातील वाळू उपसा काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही तहसीलदार मिलिंद कुलथे हे वाळू चोरीच्या तक्रारी नंतर देखील वाळू चोरी थांबविण्यात अयशस्वी ठरल्याचे म्हंटल्यास वावगे ठरू नये कारण अजनुज येथे रात्रीच्या वेळी चार, जेसीबी साहाय्याने वाळू चोरी सुरू आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी आता प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालून अवैध वाळू उपसा बंद करावा अशी नागरिक मागणी करत आहे
तालुक्यातील अजनुज,पेडगाव भीमा नदी घोडपात्रात काही दिवसांपूर्वी तहसीलदार यांनी कारवाई केली होती परंतु ही कारवाई फक्त नावापुरती झाली असल्याची चर्चा परिसरात होत आहे. कारण आता रात्री सर्रासपणे वाळू उपसा सुरू झाला असून काल रात्री अजनुज येथे 4 जेसीबी च्या साहाय्याने जोरात वाळू उपसा चालू आहे त्याकडे महसूल प्रशासन व श्रीगोंदा पोलीस जाणून बुजून दुलक्ष करीत आहे.
अशा प्रकारे राजरोसपणे वाळू उपसा चालू असून वाळू माफियांच्या डोक्यावर महसूल आणि पोलिसांचे हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही
.चौकट
प्रशासनाची कारवाई म्हणजे
तू मारल्यासारखं कर…. मी रडल्यासारखा करतो
प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार मागील दहा बारा दिवसापूर्वी
श्रीगोंद्याचे तहसीलदार यांनी महसूल चे पथक पेडगाव येथे पाठवुन अवैध वाळू उपसा वर कारवाई केली त्या मध्ये एक जेसीबी दाखवला खरा पण मोबाईल मधील चित्र करीण दाखवल्यानंतर त्यामध्ये चार पाच जेसीबी सोडून दिल्या चे दिसल्यावर तहसीलदार म्हणाले की पथकावर कारवाई करून बाकी चे जेसीबी आणतो पण अजून काही ते जेसीबी आणले नाहीत त्यानंतर मागील चार-पाच दिवसा पूर्वी आजनुज येते ग्रामसभेचा ठराव होऊन कोणालाही अवैध वाळू उपसा करू द्यायचा नाही यावर ग्रामस्थांनी तहसीलदार यांना तक्रार दिली होती तहसीलदार यांनी महसूल चे पथक पाठवले त्यामध्ये त्यांनी एक जेसीबी आणला बाकीचे जेसीबी सोडून दिली अशी चर्चा तेथील ग्रामस्थांनी केली त्यानंतर लगेच दोन दिवसाने रात्री चे जेसीबीच्या साह्याने अवैध वाळू उपसा जोरात सुरू केला यावरून असे दिसून येते की महसुलचे
लागेबंधे आहेत की काय? त्यांच्यामध्ये आर्थिक आर्थिक हितसंबंध जोपासले जातात की काय? अशी खुलेआम चर्चा होताना सगळीकडे दिसत आहे. यावरून असे दिसते की मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखे कर अशी .