35 वर्षीय महिलेवर अमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक.
35 वर्षीय महिलेवर अमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक.
श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे तथा चेअरमन यांनी एक 35 वर्षीय महिलेवर आमिष दाखवून अहिल्यानगर मुंबई दिल्ली येथे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरून लिंग पिसाट आमदाराकडून 2019 ते 2023 या कालावधीत वारंवार अत्याचार झाल्याने असाह्य झालेल्या महिलेने पोलीस स्टेशनचा धावा करत काल रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा राहुरी पोलिसांनी राहते घरातून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक केली. वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी पोलीस कुठली मध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.
महिला तक्रारदाराच्या तक्रारीवरून आरोपीने सन 2019 ते 2023 दरम्यान वेळोवेळी नगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई तसेच दिल्ली येथे लैंगिक अत्याचार केल्याबाबत तक्रार दिल्याने राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान संहिता कलम 376, 328,418, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यात आरोपी भानुदास काशिनाथ मुरकुटे, वय 82 वर्ष , राहणार श्रीरामपूर यास श्रीरामपूर येथून दिनांक 08/10/2024 रोजी 01.35 वाजता अटक करण्यात आलेली असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे.