ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वादात टाकळीभान ग्रामपंचायतला कुलूप…
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वादात टाकळीभान ग्रामपंचायतला कुलूप…
टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत मधे सत्ताधारी गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये गट तट निर्माण होऊन वाद विकोपाला गेले असून डायरेक्ट ग्रामपंचायतीस एका गटाने कुलूप लावल्याची चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायत चा कारभार पाहण्यावरून मतभेद होत असून, आम्हाला विचारल्याशिवाय ग्रामपंचायतचे कोणते निर्णय घेऊ नये, व कारभार पाहू नये म्हणून एका गटाकडून ग्रामपंचायतला कुलूप लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये आपली कामे, विविध दाखले घेणाऱ्या नागरिकांची पंचायत झाली असून ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना बाहेर पायरीवर बसण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतच्या सत्ताधारी गटातील वादामध्ये नागरिकांची गैरसोय होत असून त्यांचा भ्रमनिरास होत आहे. अगोदरच एका सदस्य पतीने ग्रामपंचायतची माहितीच्या अधिकाराखाली चौकशी सुरू असतानाच, ग्रामपंचायतला दिवसा ढवळ्या कुलूप लावले जात आहे. सत्ताधारी गटातील वाद कधी मिटणार, ग्रामपंचायत उघडेल की बंद राहील याबाबत साशंकता असून अजून नागरिकांना कोणते दिवस पाहायला मिळतील याबाबत नागरिकांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे.