पाचेगाव फाट्याजवळ पुरुष जातीचा मृतदेह आला मिळून
पाचेगाव फाट्याजवळ पुरुष जातीचा मृतदेह आला मिळून
नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाटा येथील शेतामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याने नेवासा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे मृताची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही कुणाच्या परिचयातील असल्यास तात्काळ नेवासा पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे नेवासा पोलीस स्टेशन ने आवाहन केले आहे.
🔍 पोलीस ठाणे नेवासा हद्दीत एक *अनोळखी पुरुष ईसमाची डेड बॉडी* मिळून आलेली असून सदर डेडबॉडीचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
*वर्णन:-*
वय:- अंदाजे 35 वर्षे
उंची:- 165 से. मी.
अंगावर निळी जिन्स पॅन्ट, आकाशी टी शर्ट, माचो कंपनीचे लाल रंगाची अंडर वेअर, लाल रंगाचे बनियन, दोन्ही पायात ग्रे रंगाचे सॉक्स, तपकिरी रंगाचा बेल्ट, उजव्या हाताच्या मनगटात सप्तरंगी दोर आहे, कमरेला लाल रंगाचा करदोडा तसेच सप्तरंगी नाडा, तर्जनीमध्ये अंगठी असून त्यावर महाकाल असे लिहिलेले आहे.
*शरीरावरील खुणा:-* उजव्या हातावर महादेवाचे चित्र गोंदलेले
कृपया आपल्या पोलिस ठाण्यातील अभिलेखावरील मिसिंग रजिस्टर तात्काळ काळजीपूर्वक तपासून परिणाम कळवणे.
रुद्रा न्यूज साठी प्रतिनिधी किरण जाधव