आळंदीतील वीज पुरवठा गुरुवार ऐवजी शुक्रवारी राहणार बंद पालखी सोहळा निमित्त सूचना जारी

आळंदीतील वीज पुरवठा गुरुवार ऐवजी शुक्रवारी राहणार बंद पालखी सोहळा निमित्त सूचना जारी
आषाढी वारी सोहळा 2024 च्या अनुषंगाने आळंदी विभाग वीज वितरण कंपनी कडून वीज पुरवठा बाबत सूचना जारी करण्यात आलेली आहे. वीज वितरण कंपनी च्या दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्येक गुरुवारी वीज पुरवठा खंडित करून दुरुस्तीची कामे केली जातात. आठवड्यातील एक दिवस गुरुवार म्हणून लाईट जाणार गृहीत धरले परंतु कामकाजाचा बदलते स्वरूप लक्षात घेता या आठवड्यात मात्र गुरुवार ऐवजी शुक्रवारी विज पुरवठा खंडित होणारा असल्याची माहिती महावितरण विभाग आळंदी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. नुकताच जाहीर झालेल्या आषाढी वारी सोहळा च्या निमित्ताने आळंदी सुविधा देणाऱ्या सर्व विभाग कामाला लागलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून या आठवड्यात गुरुवार ऐवजी शुक्रवारी विज पुरवठा खंडित होणार असल्याने नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी तसेच दोन फिडर वरून आळंदीला वीज पुरवठा होत असतो मरकळ वरून आणि भोसरी वरून असे त्याचे स्वरूप आहे सुरुवातीच्या काळात मरकळ रोड नंतर वडगाव रोड आणि त्यानंतर नदीपलीकडील चा भाग अशी दुरुस्तीचे स्वरूप असणार आहे परंतु टप्प्याटप्प्याने या दुरुस्तीच्या कामे मार्गी लागणारा असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुरुवातीच्या या आठवड्यात मात्र गुरुवार ऐवजी शुक्रवारी लाईट खंडित होईल याची दखल घेण्याच्या सूचना करण्यात येत आहेत नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्यामध्ये सदर दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. आळंदी महावितरण विभाग यांनी नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती या माध्यमातून केलेली आहे