राहते घरातून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा राहुरी पोलिसांनी लावला तात्काळ शोध**

*राहते घरातून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा राहुरी पोलिसांनी लावला तात्काळ शोध**
दि.18/05/2024 रोजी अल्पवयीन 2 मुली अज्ञात इसमाने पळवून नेलेबाबत
राहुरी पोलीस ठाणे गुरनं.586/2024 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्हाचे बाबत गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे व गुन्हाचे तांत्रिक विष्लेशन करुन नमुद गुन्हातील अल्पवयीन दोन मुलींना राहुरी पोलीस स्टेशनचे पथकाने पाथर्डी पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक 20/05/2024 रोजी शोध घेऊन तात्काळ ताब्यात घेतले व पालकांचे स्वाधीन केले.
सदर कारवाई राकेश ओला पोलिस अधीक्षक , अहमदनगर, वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन,पोहकॉ जानकीराम खेमनर ,पोना/रामनाथ सानप,पोकॉ/दुधाडे, मपोकॉ/कुसलकर यांनी केली आहे पुढील तपास पोना/रामनाथ सानप, हे करत आहेत