ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभानच्या वतीने रविवारी कोरोना काळातील निराधार अनाथ मुलांना शालेय उपयुक्त वस्तू वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम…
ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभानच्या वतीने रविवारी कोरोना काळातील निराधार अनाथ मुलांना शालेय उपयुक्त वस्तू वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध समाजभिमुख उपक्रम राबवले जातात, व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात येते, यावर्षी कोरोना काळातील निराधार अनाथ मुलांना शालेय उपयुक्त वस्तू वाटप, गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च देय वाटप कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले असून महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना योद्धा म्हणून परिचित असलेले आमदार निलेश लंके, व अहमदनगरच्या भूषण पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या शुभहस्ते या वस्तूंचा वाटप व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी रुक्मिणी माधव मंगल कार्यालय, टाकळीभान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनकरराव टेमकर साहेब मा. शिक्षण संचालक पुणे हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, माननीय श्री अशोक नाना कानडे, तहसीलदार प्रशांत पाटील, डी वाय एस पी संदीप मिटके, कोल्हापूर हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले, सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे, मा. रयत शिक्षण संस्था सहसचिव प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुरावजी उपाध्ये, दैनिक स्नेह चे संपादक श्री प्रकाशजी कुलथे, श्री प्रतिष्ठान अहमदनगरचे गणेश भाऊ आनंदकर, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री पोपटराव पटारे, पं. समितीच्या बाल. वि. प्रकल्प अधिकारी सौ.शोभाताई शिंदे, ह भ प दत्तात्रय बहिरट महाराज, गटशिक्षणाधिकारी श्रीमती साई लता कृष्णा सामलेटी,श्रीरामपूर, सुलोचनाताई पटारे, गटशिक्षणाधिकारी नेवासा, श्रीमती शेख शबाना अहमद, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कोपरगाव, प्रा. विजयराव बोर्डे सर, प्राचार्य जयकर मगर, सामाजिक कार्यकर्ते समशेरखा (भैय्या) पठाण आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन राऊत, कार्याध्यक्ष श्री सागर पवार यांनी केले आहे.