शाळेची फी भरा, तरच मिळेल टिसी इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून विद्यार्थ्यांची अडवणूक ; विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष.
शाळेची फी भरा, तरच मिळेल टिसी इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून विद्यार्थ्यांची अडवणूक ; विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे, त्यामुळे आपल्या पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांकडून प्राधान्य दिले जात आहे. मात्र गेवराई तालुक्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून थकीत फिस भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. फिस भरा, तरच टिसी देण्यात येईल अशी अडवणूक या शाळा व्यवस्थापनाकडून पालक व विद्यार्थ्यांची केली जात आहे. दरम्यान मागील दोन वर्षे कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या काही पालकांकडे या शाळेची फिस भरायची कशी ? असा प्रश्न आहे. फिस नाही भरली तर शाळेकडून पाल्याचा टिसी मिळत नसल्याने हे पालक चिंताग्रस्त दिसून येत असून टिसी न मिळाल्यास संबंधीत विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भिती व्यक्त होत आहे. तरी याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मागील दोन वर्षे कोरोनासारख्या महामारी रोगामुळे अनेकांचे रोजगार तर काहींचे व्यवसाय बंद पडले. यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांना अद्यापही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या कालावधीत आपल्या पाल्यांच्या शाळा फिसची पुर्तता त्यांच्याकडून होवू शकली नाही. यातच सध्या नवीन शैक्षणिक वर्षे सुरु झाल्याने आपल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणासाठी व शाळा बदलण्यासाठी टिसी ची संबंधित शाळेकडून टिसीची मागणी पालकांकडून केली जात आहे. मात्र गेवराई तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाकडून अगोदर थकीत पुर्ण फिस भरा, त्याशिवाय टिसी दिला जाणार नाही असे स्पष्ट सांगितले जात आहे. अगोदरच अव्वाच्या सव्वा फिस असलेल्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मागील दोन वर्षात हजारो रुपयांची थकलेली फिस भरायची कशी ? हा प्रश्न पालकांसमोर आहे. फिस भरल्याशिवाय टिसी शाळेकडून मिळत नसल्याने आपल्या पाल्यांचे अँडमिशन अन्य शाळेत होत नसल्याने हे पालक चिंताग्रस्त आहेत. दरम्यान टिसी न मिळाल्यास संबंधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना आहे. तर या शाळेकडून फिसच्या नावाखाली टिसीसाठी अडवणूक होत असताना शिक्षण विभाग मात्र झोपेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अडवणूक होत असल्यास संपर्क करा – बाळासाहेब मस्के शाळा अँडमिशनसाठी टिसी आवश्यक आहे. मात्र काही शाळांकडून थकीत फिस असलेल्या विद्यार्थ्यांना टिसी दिला जात नाही. यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालक व विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी फिससाठी कोणाची शाळेकडून अडवणूक होत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. त्यांना नक्कीच शाळेत प्रवेशासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.
बाळासाहेब मस्के संस्थापक अध्यक्ष, बी.एम.प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य