*आळंदी नगर परिषदेच्या सेवा पंधरावडाला थंड प्रतिसाद नागरिकांची पाठ*
*आळंदी नगर परिषदेच्या सेवा पंधरावडाला थंड प्रतिसाद नागरिकांची पाठ*
*माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील यांची पद्मावती रस्त्याची दुरुस्ती न केल्याबाबत तक्रार*
आळंदी देवाची नगरपरिषद येथे सेवा पंधरवड्याच्या आयोजन करण्यात आले होते , प्रशासकीय प्रलंबित प्रकल्प प्रकरणे निकाली काढण्यासाठी या आठवड्याचे आयोजन करण्यात आले होते, या शासकीय योजनेनुसार तात्काळ ती प्रकरणे निकालात काढण्यात येत आहेत आळंदी नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात मीडिया मार्फत सोशल मीडिया मार्फत याची जाहिरात केली परंतु आळंदी नागरिकांनी मात्र याकडे सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे याबाबत आळंदी नगरपालिकेचे माजी नगरसेवक भोसले पाटील यांनी पद्मावती रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तक्रारी अर्ज घेऊन गेले असता तेथे कोणीही संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने याबाबत विचारणा केली मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगरपरिषद वरिष्ठ कर्मचारी तर्कासे हे शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले तसेच सेवा पंधरवडा आयोजनासाठी संबंधित विभागाचे नसले तरी जबाबदार पदाधिकारी येथे हवेत अशी मागणी माजी नगरसेवक भोसले पाटील यांनी केली दरम्यान दोन दिवसांवर नवरात्र महोत्सव आला आहे आणि पद्मावती रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे माता भगिनी रस्त्याने चालणार कशा त्याची तक्रार द्यायची कोणाकडे ही अशी विचारणा माजी नगरसेवक डीडी भोसले पाटील यांनी करत नगरपरिषदेत बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागत विचारणा केली आहे, दरम्यान काही लोकांना विवाह प्रमाणपत्र तसेच काही आलेल्या नागरिकांचे ठराविक प्रश्न विचारात घेत उपस्थित कर्मचारी खरात, कर्मचारी शिंगारे ,कर्मचारी घोडे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले मात्र पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे स्पष्ट जाणवत होते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक हि यावेळी उपस्थित होते,