आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
कोंढवड परिसरात भारतीय स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राहुरी तालुक्यातील कोंढवड परिसरात भारतीय स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवा निमित्त परिसरात विविध शासकिय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज स्वातंत्र्य दिनाचे कोंढवड ग्रामपंचायतचे ध्वजारोहन सरपंच आशादेवी म्हसे,सोसायटीचे सोन्याबापू म्हसे तर मराठी शाळेचे उत्तमराव म्हसे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी सरपंच साहेबराव म्हसे राहुल म्हसे, सुनील हिवाळे, इंद्रभान म्हसे, हौशीनाथ म्हसे, शिवाजी पल्हारे, वर्षा कातोरे, वसंत शेजवळ आदी उपस्थित होते. तसेच शिलेगाव ग्रामपंचायतचे झेंडावंदन सरपंच संदिप म्हसे तर मराठी शाळेत सोसायटीचे चेअरमन डॉ.संजय म्हसे यांनी केले. या प्रसंगी विजय कातोरे, रविंद्र म्हसे, संजय म्हसे, दादा म्हसे, वनिता कोहकडे, संजय निमसे, सुनील भांड, देविदास म्हसे, आदी उपस्थित होते.