स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांची संगीत नवनाथ कथा महाराष्ट्रात प्रथमच कथा झाली*
*स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांची संगीत नवनाथ कथा महाराष्ट्रात प्रथमच कथा झाली*
अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती महंत अरूणनाथगिरीजी महाराज यांनी महाराष्ट्रात कुठेही न झालेल्या नवनाथ संगीत कथा सोहळ्याचा प्रयोग शिरेगाव (तालुका नेवासा) येथे सर्वोत्तम प्रकारे केला आहे. नऊ नाथांचे चरित्र उपस्थित भक्तांना मोठ्या प्रमाणावर भावले असून काल्याच्या किर्तनात कथाकार महाराजांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली, आयोजक श्री दिलीप रावजी पाटकर साहेब व गावकरी मंडळी शिरेगाव ता. नेवासा. यांनी अत्यंत सुंदर व्यवस्था केली.या कार्यक्रमात सदिच्छा भेट गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज कोपरगाव बेट, श्याम सुंदरजी महाराज, बजरंग दास महाराज राजस्थान, जंगली महाराज शास्त्री , राजाराम महाराज तुवर, सखाराम महाराज जाधव, रेवजीनाथ बाबा शिंदे, आदी करून साधू संत, खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, आमदार बाळासाहेब मुरकुटे,आमदार भाऊसाहेब कांबळे, विश्वासराव गडाख साहेब, पुणे ,मुंबई, अहमदनगर नाशिक महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती भाविक भक्तांनी भेट दिली .