ब्रेकिंग
टाकळीभान पञकार सेवा संस्थेला सहाकार्य करु — आदिक
टाकळीभान पञकार सेवा संस्थेला सहाकार्य करु — आदिक
टाकळीभान येथील पञकारांचे काम उल्लेखनिय आहे. येथील पञकारांनी पञकार सेवा संस्थेची स्थापना करुन सामाजिक कार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे हे चांगले काम आहे. त्यामुळे या पञकार सेवा संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व मदत करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आविनाश आदिक यांनी टाकळीभान पञकार सेवा संस्थेच्या पदाधिकार्यांना दिले.
टाकळीभान येथील पञकार सेवा संस्थेच्या शिष्टमंडळाने येथील नियोजित पञकार भवन निर्माणसंबधी आदिक यांची नुकतीच भेट घेवुन उपक्रमाविषयी चर्चा केली. यावेळी मौलिक मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि, पञकार सेवा संस्थेची सामाजिक कामाची संकल्पना स्तुत्य आहे. पञकार भवनाच्या वास्तुत विविध घटकांसाठी काम केले जाणार आसल्याने सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे. पञकारांचे समाज घडवण्याचे कार्य उल्लेखनिय आसल्याने पञकार भवनाच्या निर्मितीसाठी सर्व मदत करण्यास तयार आसल्याचे आश्वासन यावेळी आदिक यांनी दिले. यावेळी आदिक यांची जिल्हा नियोजन मंडळावर नियुक्ती झाल्याने पञकार सेवा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते देवा कोकणे, पञकार सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, रामेश्वर आरगडे, संदिप बोडखे, सचिव बापुसाहेब नवले आदी उपस्थित होते.