सावेडीत एमएमवायटीसीच्या वतीने सूर्य नमस्कार दिन साजरा

सावेडीत एमएमवायटीसीच्या वतीने सूर्य नमस्कार दिन साजरा
नगर-७५ कोटी सूर्यनमस्कार प्रकल्पाअंतर्गत श्री रामवतार मानधना चारीटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब योगा ट्रेनिंग सेंटर येथे रथसप्तमी व जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमात सुमारे शंभर मुले मुली प्रत्यक्ष तसेच सुमारे 150 विध्यार्थी व पालक वर्ग ऑनलाईन सहभागी होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू, योगतज्ञ प्रा राजेश भालसिंग सर उपस्थित होते. त्यांनी मुलांना सूर्यनमस्काराचे फायदे समजावून सांगितले व तसेच त्यांनी इतर खेळाबद्दल मुलांना प्रोत्साहन दिले, त्यांनी स्वतः मुलांबरोबर तेरा सूर्यनमस्कार आणि मंत्रांचा जप केला.
गेल्या बारा वर्षापासून अहमदनगर येथील महावीर मलखांब आणि योगा ट्रेनिंग सेंटर येथे शेकडो मुलंमुली योगा,पोल मल्लखांब, रोप मल्लखांब, आणि एरियल सिल्क या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे, आज या सेंटरच्या माध्यमातून अहमदनगर शहरांमध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू तसेच प्रशिक्षक तयार झाले आहेत. या सेंटर मध्ये नित्यनियमाने सूर्यनमस्कार त्याचा सराव दररोज केला जातो या सेंटर मध्ये वय वर्षे चार पासून मुलांचा सहभाग आहे,
, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेंटर चे मुख्य प्रशिक्षण श्री उमेश झोटिंग सर यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता तरोटे यांनी केले व आप्पा लाडाने याने सर्व उपस्थित पाहुणे व पालक वर्गाचे आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी एमएमवायटीसी चे प्रशिक्षक अक्षता गुंड पाटील,ऋतुजा वाल्हेकर,सायली शिंदे,ऋतुजा गीते तसेच पालक प्रतिनिधी डॉक्टर निलेश बकाल , त्रंबक जाधव सर यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होता. हा कार्यक्रम कोविडचे सर्व नियमांचे पालन करून पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाची झूम लिंक सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
फोटो-सावेडीत एमएमवायटीसी च्या वतीने ७५ कोटी सूर्यनमस्कार प्रकल्पाअंतर्गत श्री रामवतार मानधना चारीटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब योगा ट्रेनिंग सेंटर येथे जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमात सुमारे १०० मुले मुली प्रत्यक्ष तसेच सुमारे 150 विध्यार्थी व पालक वर्ग ऑनलाईन सहभागी होते.(फोटो- महेश कांबळे)