धार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्र

विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ याची शिकवण देत रिझवानी मस्जिद तर्फे वारकऱ्यांना जेवण*

*विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ याची शिकवण देत रिझवानी मस्जिद तर्फे वारकऱ्यांना जेवण*

 

*मुस्लीम समाजाने केली वारकऱ्यांची सेवा पुण्यात अनोखा सोहळा रंगला*

 

 पुण्यात दिनांक 25 जून रोजी आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत मोमीनपुरा, गंज पेठ येतील मुस्लिम बांधवांनी ने एकत्रित येऊन केले. रिजवानी मस्जिदच्या वतीने दिंडी करिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणाबरोबर शिरखुर्माची (मिष्ट पदार्थ) हि होते. . सामाजिक ऐक्याची भूमिका मांडणाऱ्या रिजवानी मस्जिदच्या या कार्यात शिक्षण हक्क मंचाचे उर्दू विभागातील विध्यार्थी तसेच स्थानिक पुढारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील होते. मस्जिद चे विश्वस्त हाजी अंजुम शेख व उस्मान अरब व नईम तांबोळी यांनी गुलाबाची फुले देऊन वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यावेळेस रवीन्द्र माळवदकर, वहाब मणियार, मुस्लिम बँकेचे संचालक श्री सय्यद सईद, मशकूर शेख, बबलू शरीफ, बबलू सय्यद, ऐशा तांबोळी, इत्यादी सामील होते. आजम कॅम्पस, पुणे तर्फे कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला होता. अशी माहिती मतीन मुजावर शिक्षण हक्क मंच पुणे यांनी दिली आहे

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे