ब्रेकिंग

वसुली केलेला पैसा पालिका फंडात येत नाही तोपर्यंत शुक्रवार बाजारात वसुली होऊ देणार नाही:-आकाश बेग.

वसुली केलेला पैसा पालिका फंडात येत नाही तोपर्यंत शुक्रवार बाजारात वसुली होऊ देणार नाही:-आकाश बेग.

 

श्रीरामपूर(प्रतिनिधी):-शहरात भरणाऱ्या आठवडे बाजाराबाबत पालिकेचे अधिकारीच अंधारात आहेत.डेली वसुलीच्या नावाखाली शुक्रवारच्या बाजारातील शेतकरी, व्यापाऱ्यांकडून वसूल केलेला पैसा पालिकेच्या फंडात जमा होतो पण शहरात इतरत्र भरणाऱ्या बाजारात वसूल केलेली रक्कम कुठे जाते..?या शिवसेनेचे नगरसेवक आकाश बेग यांच्या प्रश्नावर सभेचे वातावरण चांगलेच तापले होते.

 

              पालिकेची सर्वसाधारण सभा काल पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत चांगलीच रंगात संपन्न झाली.सभागृहात येताच विरोधी नगरसेवकांना बसायला कुठे जागा देणार म्हणून नगराध्यक्षांना विरोधी नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले.शिवसेना नगरसेवक आकाश बेग,भाजपाचे नगरसेवक श्रीनिवास बिहानी ,दिपक चव्हाण,वैशाली चव्हाण,यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरल्याने काहीकाळ दोन्ही बाजूंचे आवाज वाढले होते.नगरसेवक आकाश बेग यांनी आठवडे बाजार शहरात किती ठिकाणी भरतात या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले का त्यांनी न सांगण्याचे सोंग घेतले हे समजले नसले तरी एका अधिकाऱ्याने शहरात एक बाजार भरतो असे मोघम दिलेल्या उत्तरावर चांगलीच खडाजंगी झाली. त्यावर आकाश बेग म्हणाले की,शहरात इतरत्र देखील मोठ्याप्रमाणात बाजार भरतो शेतकरी,व्यापारी त्याठिकाणी आपला भाजीपाला विकण्यास घेऊन येतात.या मुद्द्यावर नगरसेवक आकाश बेग यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत डेली वसुलीचा मुद्दा सभेत चांगलाच गाजवला हिंदू बहुल भागातील शुक्रवार बाजारात डेली वसुली जोमात केली जाते पण इतरत्र भरणाऱ्या बाजारात वसुली होते पण पैसे पालिकेकडे जमाच होत नसल्याने आता येथून पुढे शुक्रवारच्या बाजारात व्यापाऱ्यांकडून डेली वसुली केल्यास त्यास आम्ही कडाडून विरोध करू असा पावित्रा आकाश बेग यांनी घेतला त्यास विरोधी नगरसेवकांनी पाठींबा दर्शविला.

 

            प्रभाग क्रमांक बारा मधील काशीविश्वेश्वर या रस्त्याचे काम मंजूर होऊनही ठेकेदाराने कामास अद्याप पर्यंत का सुरुवात केली नाही त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायची मागणी याप्रसंगी आकाश बेग यांनी केली.

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे